हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-रायरेश्वर २०

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇
🌹🌹किल्ले रायरेश्वर🌹🌹

रायरेश्वर किल्ल्याची ऊंची : 4000

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: सातारा

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते. मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून 2८ किमी अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.


इतिहास :- शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर, मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही.


पहाण्याची ठिकाणे :रायरेश्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्वराचे पठार हे ५ ते ६ किमी पसरलेले आहे. त्यामुळे या पठार वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर आहे. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.


पोहोचण्याच्या वाटा :रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे लागते.

१ टिटेधरण कोर्ले बाजूने :-

पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्ले बाजूने रायरेश्वरावर जाता येते. साधारणत: ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.


२ भोर - रायरी मार्गे :-

भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास दोन तास लागतात.


३ केजंळगडावरुन :-

केजंळगडावरुन सूणदर्याने किंवा श्वानदर्याने सुध्दा रायरेश्वरला जाता येते.

राहाण्याची सोय :रायरेश्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :कोणत्याही वाटेने जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात.जाण्यासाठी उत्तम कालावधी :सप्टेंबर ते मार्च.

🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...