हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-साल्हेर २६

⛳⛳⛳ *किल्ले साल्हेर* ⛳⛳⛳
साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्हातील सटाणे तालुक्यातील अतिशय उंच किल्ला आहे. ह्या किल्ल्याची उंची १५६७ मीटर असून सेलबारी-डोलबारी(बागलाण) डोंगररांगेत वसलेला दुर्गम किल्ला आहे. सध्याची किल्ल्याची स्थिती चांगली आहे. महाराष्ट्रातील बहुतेक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ले नाशिक जिल्हामध्ये आहेत. नाशिक जिल्हा गिरीदुर्गच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरीदुर्ग किल्ले आहेत.या गिरीदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातच आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणे या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणे तालुक्यातच आहेत.
*साल्हेर किल्ला इतिहास :*
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदा त्यांचे स्थान प्रचीतगडा जवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा. म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.
इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघलाच्या फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या किल्ला वेढा घातला. शिवाजीराजांनी तो वेढा फोडण्यासाठी आपले जिवलग व स्वाभिमानी सरदार मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा सेनापती होता. एक तर्फेने लष्करांनी वेढ्यावर हल्ला केला. एक तर्फेने मावळे लोक गनिमी काव्याने शिरले .जोरदार युद्ध जाहले. मोगलांच्या फौजेची संख्या लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे पन्नास हजार आसपास इतकीच होती. मोगल,पठाण,रजपूत याच्यासह जोरदार युद्ध जाहले.त्या युद्धात मुघलाची हार झाली. या युद्धात मराठ्यांना सहा हजार घोडे गणतीस आले. सवाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडले. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली.खासा इख्लासखान याचा पाडाव झाला. या युद्धात शिवाजीराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे धारातीर्थी पडले. त्या वर शिवाजी महाराज म्हणाले, ‘ माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.’ साल्हेरच्या युद्धात हार झाल्यामुळे मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते शिवाजी अजिंक्य आहे असे मानू लागले.
साल्हेर किल्लावर काय पाहाल ?
साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदीस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने आपण उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते.साल्हेरचा माथा हा चारही बाजुने उंच कातळकडय़ांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. घरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
गडाच्या माथ्यावर मंदिर आहे. हे मंदिर रेणूका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरुनच बाण मारुन परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते.
समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत मार्कींडय़ा, खळा-वळा, धोडप, कांचन, राजवेहेर, चौल्हे मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते.गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात.गंगासागर तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून त्याच्या आजूबाजूला जोडून असलेल्या दोन टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे.सकाळी मोरांचा आवाज कधीतरी येतो. तर उन्हाळ्यामध्ये जवळच्या धरणापाशी कधी बिबट्या दिसतात.
गडावर कसे पोचाल ?
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि.मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटूनच साल्हेरचा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. १५६७ मी. समुद्रसपाटीपासून उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर, साल्हेर असे याचे नाव पडले अशा लोककथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
*शंकर शिंदे*
9⃣4⃣2⃣3⃣0⃣3⃣9⃣6⃣8⃣3⃣
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*माहिती स्रोत*
*सोशल मीडिया व इंटरनेट*
वरील सर्व माहिती ही एखाद्या लेखकाची असेल तर कळवा, आपल्या नावासह माहिती प्रसिद्ध केली जाईल.
वरील माहिती देण्याचा हेतू फक्त महाराष्ट्रातील गडकोटाचा वैभवशाली इतिहास *फक्त भटकंती* समूहातील मित्रांना माहीत करून पर्यटन संस्कृतीला चालना देणे हा आहे.
*समूहप्रशासक फक्त भटकंती*
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...