हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-सिंधुदुर्ग (०७)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ गडकोट महाराष्ट्राचे



⛳⛳⛳ *किल्ले सिंधुदुर्ग* ⛳⛳⛳


सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोकणपट्यातील सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण या गावाजवळ अरबी समुद्रात आहे. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. इ.स १६६४ रोजी बांधण्यास सुरवात केली. अतिशय भक्कम व बळकट असा हा किल्ला आहे. या किल्याच्या जागेची पाहणी व गडाच्या बांधणीचे काम महाराजाचे निष्टावंत सेनापती हिरोजी इंदुलकर या कुशल बांधकामवीराने जवळील कोळीबांधवांच्या मदतीने पूर्ण केले. या बांधणीसाठी जवळ ३ वर्षाचा कालावधी लागला.शत्रूंकडून किल्ल्याच्या बांधकामास व्यत्य येऊ नये यासाठी महाराजांनी जवळपास ४ ते ५ हजार मावळ्याची फौज तनात केली. चैत्र शुद्ध पूर्णिमा शके १५८९ म्हणजे २९ मार्च १६६७ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी महाराजांना तोफांची सलामी दिली गेली व आजूबाजूच्या गावांमध्ये साखर वाटण्यात आहे होती. व या गडाची निर्मितीमुळे महाराजांनी पश्चिम सागरवर आपले साम्राज प्रस्तापित केले.

ह्या किल्ल्याचा तटबंदीचा विस्तार तीन-साडेतीन किलोमीटर इतका आहे व तटबंदीची उंची ३० फुट इतकी आहे गडावर बुरुजांची संख्या ५२ च्या जवळपास आहे व या बुरूजांवर चढण्या-उतरण्यास दगडी जिने बांधण्यात आले आहेत या जिन्याची संख्या ४५ इतकी आहे. गडाचा विस्तार ४८ एकरात कुरटे या काळ्या दगडावर आहे.

सिंधुदुर्ग किल्लाचा इतिहास

शिवाजी महाराजाच्या दुरर्दुर्ष्टीपणाची साक्ष देणारा हा सिंधुदुर्ग किल्ला आहे . जेंव्हा शिवाजी महाराज आपल्या स्वराजाचे प्रास्थान कोकण भागात पसरवत होते त्यावेळी त्यांनी सागरी शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी भूदलाबरोबर जलदलाचे व सागरी किल्ल्यांचे निर्माण करायचे ठरवले व त्यासाठी आरमारची व सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला कुरटे नावाच्या काळ्या खडकाच्या बेटावर बांधण्यात आला आहे. खुद्ध शिवाजी महाराजांनी या गडाची पायाभरणीची मुर्तमेढ रोवली. त्या जागेला "मोरयाचा दगड" असे म्हणतात. सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण करण्यासाठी १ कोटी होणा चा खर्च आला. ज्या कोळी बांधवानी किल्ल्याची ही जागा शोधून काढली त्यांना गावे इनामात दिली गेली.

सिंधुदुर्ग किल्लावर पाहण्यासारखे ठिकाणे:

सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय सुंदर व नयनरम्य ठिकाणी आहे . मालवणच्या किनारपट्टीवर ह्या किल्ल्याकडे बोटीतून जाताना एक अविस्मरणीय असे दर्शन घडते. बोट तुम्हाला अगदी बुरुजाच्या तटबंदीपर्यत नेऊन सोडते. तटबंदीचे अनोखे बांधकाम आपणाला इथे पहावयास मिळेल. किल्ल्याच्या आत मध्ये नारळाचा झाडांची एकप्रकारे रास मांडल्या सारखी वाटते. किल्ल्याच्या तटबंदी वरील बुरजांचे बांधकाम पाहण्यायोग्य आहे या बुरुजांवर टेहाळणी , तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या आहे .

महादरवाजा :- वक्राकार आकराच्या तटबंदीतून आत गेल्यावर आपणाला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. हा दरवाजा शिवकालीन दुर्गरचनेचा गोमुख दरवाजा आहे. महादरवाजात आपणाला एक भग्नावस्थेतील तोफ पहावयास मिळेल तसेच दरवाजावर नगारखाना आहे दरवाजासमोर एक छोटेसे हनुमानचे मंदिर आहे त्यात श्री गणेशची हि मूर्ती आहे. हा दरवाजा आज हि तितकाच मजबूत व व्यवस्थित आहे.

जरीमरीचे देऊळ:- महादरवाजातून आत गेल्यावर आपणाला पश्चिम दिशेला हे जरीमरी देवीचे छोटेखानी मंदिर दिसते. त्या वर एक शिलालेख आहे ज्याचा मध्ये १८८१ मध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. आतमध्ये पादुकाची एक मूर्ती आहे.

किल्ल्याची तटबंदी :-

किल्ल्याला जवळ-जवळ तीन-साडेतीन किलोमीटर इतकी भक्कम व मजबूत तटबंदीचा घेराव आहे. हि तटबंदी जवळपास ३ मीटर रुंद आहे. तटबंदी हि वळणावळणाची आहे. पश्चिम व दक्षिणकडील तटबंदीच्या पायात शिशाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हि तटबंदी सागरी लाटांचा व बेफाम वाऱ्याचा सामना करत ४०० दशकापासून मजबूत अशी उभी आहे. असे म्हणतात फक्त तटबंदी बांधण्यासाठीच ८० हजार होणाचा खर्च आला होता.

तटबंदीवरील घुमट्या :- तटबंदीवरून फिरत असतांना आपणाला या दोन घुमट्या पहावयास मिळील ह्या जागेला आपण शिवप्रेमीचे हे प्रेरणास्थान व आदरस्थान म्हणू शकता. ज्या वेळी गडाच्या बांधकामाची पाहणी करण्यास शिवाजी महाराज गडावर आले होते त्या वेळी चुन्याच्या घाणी चलू होत्या त्या वेळी ओल्या चुन्याच्या लाधिवर महाराजाच्या डावापायाचे व उजव्या हाताचे ठसे उठवण्यात आले होते. व त्या वरच ह्या घुमट्या उभारण्यात आल्या आहेत शिवाजी महाराजाच्या या ठ्सांचे दर्शन घेऊन शिवप्रेमीचे उर भरून येते.

श्री शिवराजेश्वरांचे मंदिर :- हे मंदिर गडाच्या अगदी मधोमध असे भव्य मंदिर आहे हे शिवाजी महाराजाचे एकमेव मंदिर आहे याची बांधणी १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांनी केली. इथे आपणाला महाराजांची पाषाणातील चांदीच्या व सणासुधीत सोन्याच्या मुखवटा असलेली मूर्ती पहावयास मिळेल. तसेच शिवरायाची चार फुटाची तलवार हि आपणाला या मंदिरात पाहावंस मिळेल.

महादेवाचे मंदिर:- गडाच्या पश्चिमला गेल्यावर आपणाला महादेवाचे मंदिर दिसेल या मंदिराचे वैशिष्ट मंदिराच्या आत एक चौकोनी आकाराची खोल अशी बारव आहे. मंदिरात नंदी समोर असेलेले महादेवाचे शिवलिंग आहे .

विहिरी:- सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रात असून या किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या खोल अशा विहिरी आहेत. व हे चमत्कारिक वाटते. दुध बाव , दही बाव व साखर बाव हि विहिरीची नावे आहेत. प्रत्येक विहिरीला चौकोनी आकाराची तटबंदी आहे. या विहीरचा वापर गडावरील लोक पिण्याच्या पाण्यासाठी करतात. दही बाव व साखर बाव जवळ जवळ आहे दुध बाव राजवाड्याच्या अवशेषाजवळ आहे .

भवानी मातेचे मंदिर:- भवानी माता हि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे त्यामुळे महाराजांनी बांधलेला जवळपास सर्व किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे . या गडावरची भवानी मातेचे उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात तलवार असेली पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. व तिचे मंदिर कौलारू आहे.

गडापर्यत कसे पोचाल ?

मुंबई-गोवा महामार्गावरून आपण मालवण गावात पोचावे तिथून आप पण बोटीच्या साह्याने गडावरती पोचावे.

गडावरती खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे.

🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...