हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ला-सिंहगड ०६

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

 *गडकोट महाराष्ट्राचे*


⛳⛳⛳ *किल्ले सिंहगड* ⛳⛳⛳

सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे या जिल्यातील एक किल्ला आहे . पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगामध्ये वसलेला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून ४४०० मीटर इतकी आहे . हा गिरिदुर्ग या प्रकारचा किल्ला आहे . हा किल्ला एकदम मोक्याच्या ठिकाणी असून या किल्लावरून आपणाला तोरणा , राजगड ,लोहगड , विसापूर , पुरंदर , तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते. हा गड ट्रेकिंगसाठी उत्तम आहे व याची चढाई सोपी आहे .

सिंहगड किल्ला इतिहास

सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा असे होते. हा किल्ला पहिल्यांदा आदिलशाहीकडे होता तेथे दादोजी कोंडदेव हे सुभेदार होते. हा गड शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिला होता.त्या गडावर उदेभान राठोड जो एक राजस्थानातील राजपूत होता नंतर त्याने धर्मांतर केले तो येथे मोगलांच्यातर्फे कोंढाण्याचा सुभेदार होता.

शिवाजी महाराजांनी या गड परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसुरे या आपल्या विश्वासू व निष्ठावंत सेनापती ज्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन मोहीमवर जाण्यास तयारी दर्शवली. जेंव्हा शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेना मोहीमवर न जाण्याचे सुचवले कारण मालुसरेच्या मुलाचे लग्नकार्य होते तेव्हा तानाजी मालुसरे उद्गारले " आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे " व आपल्या ५०० मावळ्यांसह या गडावर आक्रमण करावयास गेले. ह्या लढाई दरम्यान तानाजी मालुसुरे यांना वीरमरण आले. तीच लढाई पुढे सूर्याजी मालुसुरे जो तानाजी मालुसुरेचा भाऊ होता त्याने विजयी करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला.या लढाईतील शेलारमामा यांचे नावही मोठ्या इतबिने घेतले जाते.

ज्यावेळी शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याची व तानाजी मालुसुरेच्या बलिदानाची माहिती समजता छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले "गड आला पण सिंह गेला" यानंतर या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आहे असा इतिहास सांगतो.

सिंहगड किल्लावर पहावयास मिळेल :-

या गडावर दूरदर्शनचा एक उतुंग असा टॉवर आहे.

पुणे दरवाजा :- आपण गड चढून वर गेलानंतर आपण या भव्य प्रवेशद्वाराजवळ पोचतो हा दरवाजा बुलंद व बळकट वाटतो. दरवाजातून आत आल्यावर आपणाला दारूचे कोठार ,घोड्याच्या पागा , प्राचीन टाके पहावयास मिळेल.

कल्याण दरवाजा :- कल्याण दरवाजा हा गडाच्या पश्चिमेला म्हणजेच राजगड,तोरणा या किल्याच्या दिशेला आहे . कल्याण गावातून वर आल्यावर आपण या दरवाजातू आत प्रवेश करता. ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरजावर हत्ती व माहूत याची कोरीव शिल्पे आहे .

देवटाके: – अमृतेश्वराच्या मंदिराजवळ हे देवटाके आहेत. यामध्ये पिण्याच्या पाणी उपलब्ध आहे. महात्मा गांधी ज्यावेळी पुण्यात येत तेव्हा याच देवटाकेतील पाणी आवर्जून मागवत.

कोंढाणेश्वर मंदिर :- हे मंदिर महादेवाचे असून ते यादवकालीन आहे . हे यादवचे कुलदेवत होते. तसेच पुढे गेल्यावर अमृतेश्वर भैरव मंदिर पाहवयास मिळेल या मंदिरात आपला भैरव व भैरवी ह्या दोन मूर्त्या पहावयास मिळतील.

तानाजी मालुसुरे स्मारक :- ह्या गडावर आपणाला तानाजी मालुसरे या पराक्रमी योद्याचे स्मारक पहावयास मिळेल. इथे त्यांची एक मूर्ती जी तानाजी स्मारक समितीच्यावतीने बांधण्यात आली आहे. इथे आपला गडावरील काही इतिहासकार जे आपणाला सिंहगडाचा इतिहास पोवाड्यातून सांगतील.

डोणागिरी कडा :- यालाच तानाजीचा कडा असेही म्हणतात.याच कड्यावरून आपल्या घोरपडीच्या साह्याने दोरखंड टाकून गडावर आपल्या मावळ्यांना बरोबर आक्रमण केले.

तसेच

*गडावर अजून काय पाहाल ?*

झुंझार बुरुज, उदेभानाचे थडगे , राजाराम महाराजाची समाधि , लोकमान्य टिळकांचे निवास .

*सिंहगड किल्ल्यावरती कसे पोहचाल ?*

पुणे येथून सिंहगड किल्ला जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे . पुण्यातील स्वारगेट या बसस्थानकातून सिंहगडाच्या पायथ्यापर्यत जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहे. तसेच खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत.गडावर पायथ्यापासून पोहचण्यासाठी जवळपास २ तास लागतात.

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग जो कल्याण गावातून जातो तो थेट आपणाला कल्याणदरवाजापाशी नेतो.पुणे-कोंढणपूर या बसने कोंढणपूर गावात उतरून कल्याण दरवाजातून गडावर प्रवेश करू शकता.

दुसरा मार्ग पुणे दरवाजाकडे जातो तो खडकवासला धरणाच्या दिशेकडून आहे.गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाण्यास मार्ग उपलब्ध आहे.

गडावर राहण्याची सोय नाही आहे. पण खाण्याची व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे . इथे काही छोटे हॉटेल आहे व देवटाक्यायांमध्ये बारमाही पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय आहे.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...