हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ले-देवगिरी २३

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


⛳⛳⛳ *किल्ले देवगिरी* ⛳⛳⛳

देवगिरी किल्लाची माहिती

देवगिरी किल्ला त्याला दुसरे नाव " दौलताबाद" असे हि म्हणतात. देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रातील पर्यटन शहर मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद या शहराजवळ आहे. देवगिरी किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारतील असून या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २२१ मी. इतकी आहे. देवगिरी किल्ला हा शंकाकुर्ती आकाराचा किल्ला आहे व याचा परीघ जवळपास साडे चार किलोमीटर इतका आहे. किल्ल्याची चढाई सोपी असुन किल्ल्याची सध्याची स्थिती चांगली आहे. देवगिरी किल्ला हा यादवकालीन किल्ला आहे. देवगिरी किल्ला हा एक बलाढ्य व अभेद्य किल्ला आहे. देवगरी किल्ला हा एक अजिंक्य किल्ला होता हा किल्ला लढाई करून कधीच जिंकता आला नाही तो फक्त फितुरी करूनच जिंकला आला आहे.

देवगिरी किल्लाचा इतिहास

देवगिरी गावाची स्थापना यादव वंशाचा भिल्लम या राजपुत्राने केली. जवळ-जवळ दोनशे वर्ष यादवांनी इथे सत्ता भोगली पुढे ह्या राज्याची सत्ता सुलतानकडे गेली. देवगिरीची भोगोलिक स्थिती महत्वपूर्ण असल्यामुळे मोहम्मद बिन तुगलक याने काही काळासाठी दिल्लीवरून आपली राजधानी देवगिरीला आणली व देवगिरीचे नामकरण केले " दौलताबाद " . कारण देवगिरी हे भारताचा मध्य ठिकाणी असल्यामुळे इथून उत्तर व दक्षिण या दोन्ही दिशेला वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकते.

देवगिरी किल्ल्यावर काय पाहाल?

देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात महत्वपूर्ण असा एक अभेद्य किल्ला आहे . देवगरी किल्ल्यावर आपल्याला भारताच्या इतिहासाच्या व संस्कृतीच्या पावूलखुणा जागोजागी पहावयास मिळतील. देवगिरी किल्ला हा एक यादवकालीन व मोघलाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण असा किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे बांधकाम जे शत्रूसाठी या किल्ल्यावर चढाई करणे म्हणजे आपले प्राण त्यागणे असेच होत. देवगिरी किल्ल्याच्या या वास्तू पाहण्याजोग्या आहे. तटबंदीवजा भव्य व शिल्पांनी सजलेला दरवाजातून आपण प्रवेश करून आत आल्यावर आपण किल्ल्याच्या सुरवातीच्या जागी येऊन पोचल. डोंगरीकिल्ला असला तरी किल्ल्याच्या भिंती तळापासून बांधलेल्या नजरेस पडतात. देवगिरी किल्ला हा अनेक तटबंदीने वेडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यापर्यत पोचण्यासाठी आपणाला किल्ल्याचे सात दरवाजे व सात तटबंदी पार कराव्या लागतात.

महाकोट दरवाजा :- पहिली तटबंदी ओलांडून आत आल्यावर आपणाला हा भव्य दरवाजा पहावास मिळेल. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. महाकोट दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. शत्रूकडील हत्तीच्या धडकेपासून वाचण्यासाठी दरवाजावर लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. ह्या दरवाजातून आत गेल्यावर आपणाला त्या किल्ल्याचे भव्यपण तसेच सुरेख व सुंदर बांधकाम पहावयास मिळते. महाकोट दरवाजा जवळ एक सरस्वती नावाची विहीर व एक जैन मंदिर आहे. पहिल्या व दुसऱ्या दरवाजातून पुढे आल्यावर एक मोकळी जागा पहावयास मिळेल तिथे आपणाला किल्ल्यावरील चाकांच्या गाड्यावर ठेवलेल्या छोट्या तसेच मोठ्या सुरेख तोफा पहावयास मिळेल. शत्रूपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी या तोफांचा वापर केला जाई. इथे तोफा व त्याचे दारुगोळे आपणाला सुस्थितीत ठेवेलेले पहावयास मिळतील.

टेहाळणी बुरज :- टेहाळणी बुरज हा तिसऱ्या दरवाज्या समोर आहे. जेंव्हा शत्रू पहिला व दुसरा दरवाजा ओलांडून तिसऱ्या दरवाजापाशी येतो. तर समोरच टेहाळणी बुरजावर शत्रूवर तोफांचा व बाणांचा मारा करण्यासाठीची हि जागा आहे. शत्रूला संभ्रमित करण्यासाठी तिसऱ्या दरवाजापाशी आणखी एक दरवाजा आहे. शत्रूला ठिकठिकाणी अडवण्यासाठी किल्ल्यावर असे अनेक मनोरे चिरेबंद भिंती बांधण्यात आल्या आहेत.

चांदमिनार :- चांदमिनार हा कुतुबमिनारची एक प्रतिकृती असल्यासारखी आहे.चौथ्या तटबंदीतून आत आल्यावर आपणाला एक सपाट भाग पहावयास मिळेल. थोडे पुढे गेल्यावर आपणाला हा गुलाबी रंगाचा तीन मनोरे असलेला चांदमिनार पहावयास मिळेल. या मिनारला प्रत्येक मजल्याला ऐंशी पायऱ्या व सहा झरोके आहेत अतिशय सुंदर असे या मनोऱ्याचे बांधकाम आहे. पूर्वी यावर जाण्यास देत होते पण काही आत्महत्याचे प्रयत्न झाल्यामुळे आता याच्या वर जाण्यास बंदी आहे.

हत्ती तलाव :- चांदमिनार पार करून पुढे गेल्यावर आपणाला हा भलामोठा हौदाच्या आकाराचा तलाव पहावयास मिळेल. त्यास हत्ती तलाव म्हणतात. हा किल्ल्यावरील सर्वात मोठा तलाव आहे व ह्या तलावातून किल्ल्यासाठी सर्वत्र पाणीपुरवठा केला जाई. जवळ किल्ल्यावरील उध्वस्त झालेल्या वास्तूचे अवशेष पहावयास मिळेल.

भारतमाता मंदिर :- हत्ती तलावाच्या समोरच एक भव्य दरवाजा लागतो त्या दरवाजातून आत गेल्यावर एक भव्य सभा मंडप दृष्टीस पडतो. तसेच पुढे गेल्यावर आपणला सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांची रास नजरेस पडते. यादवकालीन वास्तूपरंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १९४७-१९४८ या मध्याच्या काळात स्थानिकानी भारतमातेच्या मूर्तीची इथे स्थापना केली.

कालाकोट दरवाजा :- हा किल्ल्याच्या पाचव्या तटबंदी बांधलेला एक भव्य दरवाजा आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणाला जागोजागी यादवकालीन शिप्ले तटबंदीच्या भिंतीवर कोरलेले तसेच धान्य साठवून ठेवण्यासाठी जमिनीत केलेले रांजण दिसतात. थोडे पुढे गेल्यावर आपणाला चीनी महाल व निजामशाही महाल याचे अवशेष पहावयास मिळतील.

मेंढा तोफ :– हि कालाकोट दरवाजापाशी असलेल्या जवळच्या बुरजावरील एक भव्य व पंचधातूनी बनवलेली एक सुंदर अशी तोफ आहे. या तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकार व एका बाजू बत्ती रातक आहे. हि लांबपल्याची तोफ असुन हि औरंगजेब याच्या सांगण्यावरून मुहम्मद हसन अमले अरब याने घडून आणली आहे असे ह्या तोफेवर नमूद केलेला मजकूर आहे.

बालेकिल्ला :- बालेकिल्ला किल्ल्याचा महत्त्वाचा भाग आहे. ह्या बालेकिल्ल्याचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट व हुशारबुद्धीने केले आहे. या बालेकिल्ल्याच्या चारीबाजूने एक सोळा मीटर रुंदीचा खंदक खोदून काढला आहे. हा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतिने बांधला आहे. तो पूर्ण खंदक पाण्याने भरून त्यामध्ये मगरी व सुसरी या सोडल्या जायच्या ज्याच्यामुळे शत्रू बालेकिल्लापर्यत पोचू शकत नसे. बालेकिल्ला व खंदकापलीकडील भाग हा एका पुलाने जोडलेला असायचा शत्रूने स्वारी केलावर हा पूल उचला जायचा. आता इथे सरकारने एक लोखंडी पूल बांधला आहे.

भुलभुलैय्या मार्ग :- हि बालेकिल्ल्यामधील संपूर्ण अंधारी मार्ग असून. चुकून बालेकिल्ल्यामध्ये शत्रू आत आला तरी हि भूलभूल्या मार्गे तो संभ्रमात पडायचा. यामध्ये अनेक चकवेमार्ग आहेत ज्यामुळे शत्रू त्या मार्गाने भ्रमित होऊन भल्यामोठ्या खंदकात जाऊन पडे. आता हे चकवे मार्ग जाळी लावून बंद केले गेले आहेत. याच्या टोकावरून संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्यात येतो. तेथून पुढे गेल्यावर एक गणेश मंदिर आपणाला दिसेल.

बारादरी :- किल्ल्यावरील सर्वात आकर्षणाची व अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. ह्या वास्तूला पूर्व दिशेला बारा मोठ्या कमानी आहे त्यामुळे याला बारादरी असे म्हणतात. हि वास्तू चुन्याच्या व दगडाच्या साह्याने बनवलेली पांढरीशुभ्र अशी इमारत असून याचे बांधकाम बघण्यासारखे आहे. हि वास्तू उंच डोंगरावर मोघलाना उन्हाळा राहण्यासाठी बनवलेली वास्तू आहे. एका लाकडी ओठ्यावर ठेवलेली तोफ आहे जी चौफेर फिरून शत्रू वर मारा करत असे.

बालकोट :- गुहेपासून थोडे वर गेल्यावर आपला हा बालकोट हि वास्तू पहावयास मिळेल. याला दौलताबादचा बालेकिल्ला असे हि म्हणतात. याच्या भवती मजबूत तटबंदी आहे. त्याच्या बुरूजावर एक सुंदर आणि भव्य तोफ आहे याला "दुर्गा तोफ" किंवा दुळधान तोफ असे हि म्हणतात.

देवगिरी किल्ल्यावर कसे पोचाल ?

औरंगाबाद पासून देवगिरी किल्ला हा १४ किलोमीटर अंतरावर आहे. आपणाला देवगिरी किल्ल्यापर्यत पोचण्यासाठी औरंगाबाद शहरातून एसटी किंवा खाजगी वाहने सुद्धा मिळू शकतात.

जवळचे रेल्वे स्थानक व विमानतळ सुद्धा औरंगाबाद शहरच आहे. गडावर खाण्याची सोय नसून किल्ल्याच्या पायथ्याशी हॉटेल उपलब्ध आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...