हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ मे, २०१८

किल्ले-मोहनगड ४८

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किल्ले मोहनगड
किल्ल्याची ऊंची : 1890
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: वरंधा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
कोकणात जाणार्या घाटवाटा म्हणजे त्या काळच्या दळणवळण , व्यापाराचा एक उत्तम मार्ग असे. मग तो कावल्या घाट असो वा सिंगापुर नाळ , बोरोट्याची नाळ , बोचेघोळ नाळ , अगदी आग्या किंवा निसणीची वाट असो प्रत्येक घाटवाट आपलं एक स्वतःच वैशिष्ट्य जपणारी असते. त्यामधलीच एक महत्वाची घाटवाट म्हणजे वरंधा घाट. कोकणातल्या महाडहुन घाट माथ्यावरच भोर गाठण्यासाठी एक मोक्याची वाट.

पायथ्याच्या दुर्गाडी गावच्या नावावरून "दुर्गाडी किल्ला" असे नाव पडले. किल्ल्यावरील जननी मातेच्या मंदिरामुळे "जननीचा डोंगर" या नावानेही हा किल्ला ओळखला जातो.
*इतिहास :*
घाटवाटांना संरक्षण देण्यासाठी त्याकाळी राज्यकर्त्यांनी मोक्याच्या जागी गड किल्ल्यांची बांधणी केली. प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी राजांनी बाजीप्रभूंना लिहिलेले एक पत्र म्हणजे मोहनगडाला पुनः प्रकाशात आणण्यासाठी ठरलेला एक उपयुक्त दूवा आहे. पत्रात राजे बाजीप्रभुस म्हणतात, " फार दिवसांपासून ओस पडलेला जसलोधगड किल्ला डागडुजी करून व्यवस्थित करावा , ५-२५ शिबंदी बसवावी अन गडास मोहनगड ऎसे नाव दयावे , गड राबता ठेवावा". याच पत्राचा आधार घेऊन २००८ साली पुण्याच्या सचिन जोशींनी दुर्गाडी/जननीचा डोंगर हाच मोहनगड उर्फ़ जसलोधगड म्हणून प्रकाशात आणला.

*पहाण्याची ठिकाणे :* किल्ल्यावर तटबंदी, बुरूज किंवा अजुन काही बांधकाम नजरेस पडत नाही. एक पक्के बांधकाम केलेले जननी मातेचे मंदिर अन थोड़े पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्यावर पाण्याची तीन टाके आहेत. त्यामधील एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य असे आहे.

आकाश निरभ्र असेल तर मोहनगडावरुन राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड, कावळा किल्ला हे किल्ले दिसतात.
*पोहोचण्याच्या वाटा :*
१) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड गाठावे. महाडच्या पुढे महाड - भोर रस्तावर वरंधा घाट चढायला सुरुवात करावी. वरंधा घाटाने १० किलोमीटर गेल्यावर पुढे उजव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. शिरगावातून उजव्या बाजूची वाट किल्ल्यावर जाते. (शिरगावात शेवटी एक मंदिर लागेल इथूनच वाट किल्ल्यावर जाते)
२) मुंबई-> पुणे-> भोर मार्गे वरंधा घाटाने महाडला जातांना भोर पासून ३० किलोमीटरवर डाव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. या फ़ाट्यावर वळुन २ ते ३ किमी पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक मंदिर लागते. तेथूनच मोहनगडावर जाण्याची वाट आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यापैकी दोन वाटा शिरगावातून, तर एक वाट दुर्गाडी गावातून आहे. शिरगावात शेवटी एक मंदिर आहे. मंदिरा समोरुन जाणारी उजव्या बाजूची वाट गावकर्यांची नेहमीची किल्ल्यावर ये जा करण्याची वाट आहे, त्यामुळे ती मळलेली आहे. पण जर किल्ल्याच्या पायथ्याच घनदाट जंगल अनुभवायचे असेल तर डाव्या बाजूची वाट पकडावी. ही वाट पुढे दुर्गाडी गावातून वर येणार्या वाटेलाच मिळते. याच वाटेवर एक मुर्ती उभी करून ठेवलेली आहे. पुढे गेल्यावर अजून एक मंदिर आणि त्यापुढे कातळात कोरलेल्या पायर्या आपणास गड माथ्यावर नेउन सोडतात.
*राहाण्याची सोय :*
किल्ल्यावरील मंदिरात ३ ते ४ जण राहू शकतात.
*जेवणाची सोय :*
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
*पाण्याची सोय :*
किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
*जाण्यासाठी लागणारा वेळ :*
किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.जाण्यासाठी उत्तम *कालावधी :*
वर्षभर किल्ल्यावर जाता येते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलक
श्री शंकर इंगोले
९८२२७९७०५९
माहिती स्रोत
*ट्रेकक्षितिज.

मंगळवार, २९ मे, २०१८

किल्ला-रवळ्या ४७

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
किल्ले शिवबाचे
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : कठीण
रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.

Rawlya
इतिहास :
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.
पहाण्याची ठिकाणे :
रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून "चिमणी क्लाईंब" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.
राहाण्याची सोय :
पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
मार्च ते सप्टेंबर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-
श्री शंकर इंगोले
9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २८ मे, २०१८

किल्ले-राजापुरची वखार ४६

ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse)
💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐
किल्ल्याची ऊंची : 42
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी
श्रेणी : सोपी
अर्जुना नदीच्या काठी वसलेले राजापूर हे प्राचीन काळापासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते. घाटावरील बाजारपेठां मधून आलेला माल अणुस्कुरा घाटाने राजापूर बंदरात येत असे. तेथून बोटीने तो माल अरबस्त्तानात आणि भारतातील इतर बंदरात जात असे. इसवीसन १६४८ मध्ये आदिशहाच्या ताब्यात हा भाग होता. त्यावेळी इंग्रजांनी या ठिकाणी फॅक्टरी म्हणजेच वखार बांधली. या वखारीत असलेल्या मालाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी याठिकाणी भरभक्कम किल्लाच बांधला. किल्ल्याप्रमाणे तटबंदी, बुरुज, खंदक बांधून, तोफानी वखार संरक्षणाच्या दृष्टीने सुसज्ज करण्यात आली होती. राजापूर शहरात आज या वखारीचे थोडेसेच अवशेष शिल्लक आहेत. वखारीत पोलिस वसाहत आहे.

Rajapur Fort (British warehouse)
पहाण्याची ठिकाणे :
राजापूरच्या जवाहर चौकात एसटीच्या गाड्या येतात. या चौकातून एक रस्ता धुतपापेश्वर मंदिराकडे जातो. या रस्त्यावर प्रथम अर्जुना नदीवर बांधलेला शिवकालीन पुल लागतो. पुल ओलांडल्यावर रस्ता नदीला समांतर जाउन चढायला लागतो. याच चढावर डाव्या बाजूला राजापूरच्या वखारीचे अवशेष आहेत .

या परिसरात शिरल्यावर समोरच चिर्यात बांधलेल्या पडक्या वास्तूंचे अवशेष दिसतात . डाव्या बाजूला एक मजली इमारत आहे . पडक्या वास्तू आणि इमारती मधून एक पायऱ्याचा मार्ग नदीकडे उतरतो. या मार्गाने खाली उतरुन उजवीकडे चालत गेल्यावर किल्ल्याचा उजव्या टोकाचा बुरुज बाहेरुन पाहात येतो.पायऱ्या चढून परत वखारीत येउन इमारतीच्या उजव्या बाजूला गेल्यावर एक आयताकृती विहीर आहे . या विहिरीच्या बाजूला किल्ल्याचा दुसरा बुरुज आहे . वखारीच्या इतर भागात पोलिस वसाहत वसलेली असल्याने वखारीचे अवशेष नामशेष झालेले आहेत .

राजापूरच्या वखारी बरोबर पुरातन धुतपापेश्वर मंदिर पाहाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
राजापूर शहर रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरांशी जोडलेले आहे . राजापूर शहरातील जवाहर चौकातून एक रस्ता धुतपापेश्वर मंदिराकडे जातो. या रस्त्यावर प्रथम अर्जुना नदीवर बांधलेला शिवकालीन पुल लागतो. पुल ओलांडल्यावर रस्ता नदीला समांतर जाउन चढायला लागतो. याच चढावर डाव्या बाजूला राजापूरच्या वखारीचे अवशेष आहेत .
राहाण्याची सोय :
राजापूर गावात राहाण्यासाठी हॉटेल्स आहेत .
जेवणाची सोय :
राजापूर गावात जेवण्यासाठी हॉटेल्स आहेत
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-श्री शंकर इंगोले
9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

किल्ले-रेवदंडा ४५

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐
किल्लेमहाराष्ट्राचे
प्रकार : समुद्रकिनाऱ्यावरीलकिल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव भोवती तटबंदी बांधून किल्ल्याच्या कवेत घेतल.
इतिहास :
पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४ च्या दरम्यान बांधली गेली. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातला. तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
पहाण्याची ठिकाणे :
रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनार्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोर्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोर्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोर्यावरुन उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिर्यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोर्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ,पूणे हून रेवदंड्याला जाण्यासाठी थेट बसेस आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरुन किनार्यावरुन गड पाहायला सुरुवात करावी.
राहाण्याची सोय :
किल्ल्यात राहण्याची सोय नाही, रेवदंडा गावात आहे.
जेवणाची सोय :
किल्ल्यात जेवणाची सोय नाही, रेवदंडा गावात आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाण्याची सोय नाही, रेवदंडा गावात आहे.
सूचना :
रेवदंडा व कोर्लई हे गड १ दिवसात पाहाता येतात.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-
श्री शंकर इंगोले
९८२२७९७०५९
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शुक्रवार, २५ मे, २०१८

किल्ले-कैलासगड ४४

किल्ले -महाराष्ट्राचे किल्ला क्र. 44
🌹🌹किल्ले कैलासगड🌹🌹
किल्ल्याची ऊंची : 3300
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: कैलासगड
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
लोणावळ्याच्या डोंगररांगेत उगम पावणार्या मुळा नदीवर मुळशी धरण बांधलेले आहे. या मुळा नदिच्या खोर्यावर तसेच पुण्याहून ताम्हणी मार्गे कोकणात उतरणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्याच स्थान आणि आकार पाहाता हा टेहळणीचा किल्ला होता. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्या रस्त्याने पेठ शहापूर - भांबुर्डे - मार्गे पुढे जात असतांना भांबुर्डेच्या पुढे उजव्या बाजूला डोंगररांग तर डाव्या बाजूला मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा आपली साथ संगत करत असतो. या डोंगररांगेत सवाष्णी घाटावर लक्ष ठेवणारे तैलबैला, घनगड हे किल्ले आहेत. याच रस्त्यावर असलेल्या वडुस्ते गावाच्या पुढे कैलासगड किल्ला आहे. मुंबई आणि पुण्याहून हा किल्ला एका दिवसात पाहाता येतो.
इतिहास :किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवहान काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवीसन १७०६ मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो.

पहाण्याची ठिकाणे :
लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर , तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने एक किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे. या टेकडीवर जाणार्या मळलेल्या पायवटेने आपण १५ मिनिटात टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. येथून मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा व्यवस्थित दिसतो. पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे. हि टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.

टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा सरळसोट कडा खाली उतरलेला आहे. त्यामुळे किल्ल्याचा डोंगराला वळसा घालून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला पठार आहे. त्यावर एक भगवा झेंडा लावलेला आहे. या पठारावरून दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे. त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. या अवधड वाटेने ५ मिनिटे उतरल्यावर आपण कातळात खोदलेल्या गुहा टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्यात खांब खोदण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. पण दगड ठिसूळ लागल्याने काम अर्धवट सोडले असावे.

टाक पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजूला एक दगडांची भिंत घातलेली दिसते. त्याच्या आत कातळावर कोरलेल शिवलिंग आहे. इथे आपली गड प्रदक्षिणा संपते. येथे आपल्याकडे दोन पर्याय असतात. आल्य मार्गाने खिंडीत उतरायच किंवा शिवलींगाच्या पुढे असलेल्या टोकावरून उतरणार्या पायवाटेने खालच्या रस्त्यावर भादसकोंडा गावाच्या दिशेला उतरायच. भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर वडुस्ते - ताम्हणी रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे मंदीर आहे. तेथुन वर चढुन गेल्यावर एक नैसर्गिक गुहा आहे. ती पाहून डांबरी रस्त्याने आपण १० मिनिटात खिंडीपाशी पोहोचतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहुन लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्या रस्त्याने पेठ शहापूर - बा - मार्गे वडुस्ते हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे. लोणावळ्यापासून वडुस्ते गाव ५१ किमी अंतरावर आहे. लोणावळे - वडुस्ते अशी एसटी बस आहे. पण या मार्गावर इतर रहदारी फ़ारशी नसल्याने. खाजगी वहानाने गेलेले चांगले. लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर , तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने दोन किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे. येथुन एक तासात गडावर पोहोचता येते.

पुणे-मुळाशी-ताम्हणी मार्गे कैलासगड ७८ किलोमीटरवर आहे. पुणे मार्गे येतांना भादसकोंडा गावाच्या पुढे कैलास गडाची खिंड आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्याच्या परिसरात जेवणाची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून एक तास लागतो.जाण्यासाठी उत्तम कालावधी :सर्व ऋतूत किल्ला पाहाता येईल.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-
श्री शंकर इंगोले
9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

किल्ले-पर्वतगड/हडसर ४३

🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺🌺💐
किल्ले हडसर
किल्ल्याची ऊंची : 3200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: नाणेघाट
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.
इतिहास :हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.
पहाण्याची ठिकाणे :हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते, तर दुसरी वाट डावीकडे असणार्या दुसर्या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसर्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कड्यालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेश प्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव आणि महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते.
तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेकर्यांची देवडी आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. तसेच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.
पोहोचण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकर्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायर्या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.
जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते.. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणार्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायर्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.
राहाण्याची सोय :हडसर वरील महादेवाच्या मंदिरात ४ ते ५ जणांना राहता येते. मात्र पावसाळ्यात मंदिरात पाणी साठत असल्याने राहण्याची गैरसोय होते.
जेवणाची सोय :किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :किल्ल्यावर प्रवेशद्वारातून वरती आल्यावर समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :हडसर गावातून गडावर जाण्यास १ तास लागतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-
श्री शंकर इंगोले
सौजन्य-
ट्रेकक्षितिज.कॉम

किल्ले-दौलतमंगळ ४२

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹 *किल्ले दौलतमंगळ🌹किल्ल्याची ऊंची : 2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुणे - सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला "दौलतमंगळ गड" हे नाव पडले असावे.
पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.
इतिहास :पौराणिक आख्यायीके नुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होउन येथुनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादवांनी केली.
१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशाहाच्या पदरी राहाण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले. युध्दाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावने पुण्यावर हल्ला करुन पुणे उध्वस्त केले. त्यावरुन गाढवाचा नांगर फ़िरवला.
मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.
पहाण्याची ठिकाणे :पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.पोहोचण्याच्या वाटा :स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे - हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :गडाचा /मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.
पाण्याची सोय :पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :यवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलक-
श्री शंकर इंगोले
९८२२७९७०५९
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, २२ मे, २०१८

किल्ला-तोरणा ४१

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किल्ले तोरणा
किल्ल्याची ऊंची : 1400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
इतिहास :तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
पहाण्याची ठिकाणे : पोहोचण्याच्या वाटा : पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.
राहाण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :१) वेल्हेमार्गे अडीच तास लागतात. २) राजगड - तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संकल्पना*
🌸शंकर इंगोले🌸
९८२२७९७०५९

सोमवार, २१ मे, २०१८

किल्ले-सिंहगड ४०

⛳⛳⛳ *किल्ले सिंहगड* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची : 4400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: भुलेश्वर,पुणे
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झालेला सिंहगड किल्ला, पुणे शहराच्या सानिध्यात असल्याने कायम गजबजलेला असतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. तानाजींच्या बलिदाना नंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले. सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरून दिसतो.
इतिहास :हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहिकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला.

सिंहगड हा मुख्यत्र: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले.

या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:

तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की,‘कोंडाणा आपण घेतो ‘, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही, मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले, किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा ते म्हणाले ,‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला‘ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

इ.स. १६८९ च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३ मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंडाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. शनिवार दि २ मार्च इस १७०० या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरती निधन झाले.पुढे इ.स. १७०३ च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव ’बक्षिंदाबक्ष’ (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५ च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात मिळवला.
पहाण्याची ठिकाणे :१) पुणे दरवाजा :-
गडाच्या उत्तरेला हा दरवाजा आहे शिवकालाच्या पूर्वीपासून ह्याच दरवाजाचा वापर मुख्यत: होत असे. पुण्याच्या बाजूस असणारे असे हे एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. यापैकी तिसरा दरवाजा हा यादवकालीन आहे.


२) खांद कडा :-
दरवाजातून आत आल्यावर ३० ते ३५ फूट उंचीचा असा हा खांद कडा लागतो. यावरून पूर्वेकडील पुणे, पुरंदरचा परिसर दिसतो.


३) दारूचे कोठार :-
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार होय. दि ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.


४) टिळक बंगला :-
रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.


५) कोंढाणेश्वर :-
हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

६) श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :-
कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे


७) देवटाके:-
तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.


८) कल्याण दरवाजा :-
गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. या ठिकाणी,

" श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द

श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान"

असा शिलालेख आढळतो


९) उदेभानाचे स्मारक :-
दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे, तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.

१०) झुंजार बुरूज :-
झुंजार बुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसते, पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.


११) डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा :-
झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला होता.


१२) राजाराम स्मारक :-
राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

१३) तानाजीचे स्मारक :-
अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिध्द तानाजीचे स्मारक दिसते. ’तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

पोहोचण्याच्या वाटा :पुण्याच्या नैऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे. खाजगी वाहनाने थेट गडावर जाता येते. पायी जाणार्यांसाठी गडाच्या पायथ्याला असलेल्या हातकरवाडी गावात पोहोचणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMT) बसेस स्वारगेट पासून हातकरवाडी जातात. हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला १.३० तासात गडावर घेऊन जाते.
१) पुणे - कोंढणपूर मार्गे :-
पुणे - कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

२) पुणे दरवाजा मार्गे :-
पुणे - सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.


राहाण्याची सोय :गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :गडावरील हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :देवटाक्यांमधील पाणी बारामहिने पुरते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :पायथ्या पासून २ तास लागतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌸🌸संकलक🌸🌸
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९

*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम* *

किल्ला-शिवनेरी ३९

🌹🌹🌹🌹🌹🌹शिवनेरी
डोंगररांग-नाणेघाट. किल्ल्याचा प्रकार-गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे. इ.स. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

Shivneri

Shivneri
इतिहास :
’जीर्णनगर’, ’जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.

इ.स. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक उत्तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक उत्तुजार प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन, त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार’.

इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये तो गड मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले, यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.


पहाण्याची ठिकाणे :
जुन्नरहून डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा.
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ’ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणार्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात, एक वाट समोरच असणार्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते, वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा अविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’ मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला, तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाकं’ आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उ
सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास लागतात.
किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो


पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
१) साखळीची वाट :-
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात.डाव्या बाजूस जाणार्या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पायर्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.

२) सात दरवाज्यांची वाट :-
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दीड तास लागतो.

३) मुंबईहून माळशेज मार्गे :-
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ किमी’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास एक दिवस लागतो

राहाण्याची सोय :
या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणार्या वर्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
साखळीच्या मार्गे पाउण तास, सात दरवाजा१/२ तास.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

किल्ले-सोलापुर भुईकोट किल्ला (३८)

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश (तेलंगणा) या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले एक मिश्रभाषिक गाव म्हणजे सोलापूर. याच सोलापुरात एक अप्रतिम कलाकुसरीने नटलेला भुईकोट आहे. सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी (शके / इ.स.) १४६३ च्या सुमारास हा किल्ला बांधला.
 36 Photos available for this fort
Solapur Fort
पहाण्याची ठिकाणे :
सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्यात पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराने आपण प्रवेश करतो, ती किल्ल्याची तटबंदी तोडून केलेली व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वार हे सध्याच्या सावरकर मैदानाच्या बाजूने आहे. किल्ल्यात मुख्य दरवाजाने प्रवेश करताना जुनी मोठी जाड साखळी आणि वीरगळ आपले स्वागत करतात. किल्ल्याला तीन बाजूनी खंदकाने वेढलेले आहे. चौथ्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आणि तलाव आहे. त्याच खंदकावर बांधलेल्या आधुनिक पुलावरून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी पूल पार केल्यावर डाव्या बाजूला झाडाझुडपांत लपलेली नागबावडी आहे.

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे, लोखंडी जाड पट्ट्या अजूनही शाबूत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाज्यावर तीन झरोक्यांची रचना केलेली आहे. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्या समोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाज्यांमध्ये युध्द मैदानासारखी मोठी जागा आहे. शत्रू आत आल्यास त्याला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या वरील दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाज्याच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत. या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह, राजा सुलतान मोहम्मद, त्यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. दरवाजा वरील खिडक्यांमधे शरभ आणि मृग शिल्प बसवलेले आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर अस्पष्ट असा देवनागरी लिपिमधील शिलालेख नजरेस पडतो. या दरवाज्याच्या आतील बाजूसही पहारेकऱ्यांच्या खोल्या दिसतात.

किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराशी लागूनच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासळत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला (जोशी घराणे) तत्कालीन शासनाने १५ रु. वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे (महाकालेश्वर) आणि शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प (एक दुसरे असेच शिल्प हुतात्मा बागेत घसरगुंडीच्या बाजूला आहे) आणि व्दारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्या वर फारसी लिपीतील (हिजरी ९८६; इ.स.१५७८-७९) शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबीद खान याने मशीद, बाजारपेठ, बाग, हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे.
तिसऱ्या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोलीमध्ये एक वीरगळ आहे. वीरगळीच्या बाजूस शिलालेख आहे. त्यात किल्ल्यातील विहिरीचा निर्मितीचा उल्लेख केलेला आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूस वीटांनी बांधलेली वास्तू आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. १४ कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे, विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे.


१८१९ साली उत्खननानंतर या मंदिराचे काही खांब वापरून शहराच्या बाळीवेस परिसरामध्ये नवीन मल्लिकार्जुन मंदिर बांधण्यात आले. किल्ल्यातले मंदिर श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बांधल्याचा उल्लेख कवि राघवांक यांनी केलेला आहे. या मंदिराला देवगिरीचे यादव, कदंबराजे, व इतर सावकार यांचेकडून वतने, इनामे मिळाल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या उत्खननात सापडलेले दोन कन्नड शिलालेख व मोठे व्दारपाल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहलयात ठेवण्यात आलेले आहेत आणि देवीची मूर्ती चंदीगडच्या वस्तुसंग्रहालयात आहे.
मंदिराच्या डावीकडे काही अंतरावर एक वास्तू आहे. तिला ३२ खांब असल्याने ३२ खांबी मस्जिद म्हणले जाते. येथील कोरीव खांब, नक्षीयुक्त सजावटीने नटलेले आहेत. वास्तुमध्ये आत समोरून थंड हवा येण्यासाठी एक फट ठेवलेली पहावयास मिळते. वास्तूच्या आणि मंदिराच्या तिरक्या दिशेला किल्ल्यातील चौकोनी आकाराचा उंच बुरुज उठून दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असून तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. शेजारीच चौकोनी दोनही बाजूस पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. परंतु झाडी वाढल्याने ती लवकर निदर्शनास येत नाही.
चौकोनी बुरुजाच्या दिशेने उजवीकडे बुरुजावरून चालत गेल्यास बुरुजावरच एक मोडी लिपीतील शिलालेख दिसतो. इ. स. १६८० चा काळ दर्शविणारा हा शिलालेख इकडील तटबंदी कच्ची होती, ती पक्की बांधून काढल्याचे सांगतो. इथूनच पुढे दर्गोपाटील बुरुज आहे. महाकालेश्वर बुरुजाप्रमाणे इथे दर्गोपाटील घराण्यातील बाळंतीणीला आत्मसमर्पण करावे लागले, तेव्हा हा बुरुज बांधून पूर्ण झाला. इथेही गुढी पाडव्याला उत्सव साजरा होतो. बुरुजावारच पद्मावती देवीचे मंदिर आहे.

दर्गोपाटील बुरुजाच्या (पद्मावती) पुढेच बाळंतीण विहीर दिसते. ही विहीर लांबट आयाताकर असून त्याच्या कडेला एक हवेशीर सज्जा आहे, आणि तिथूनच खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. बाळंतीण विहिरीकडे जाताना बुरुजाच्या वरील बाजूस एक फारसी लिपीतील शिलालेख दिसतो. यामध्ये सुलातानासाठी सुखकारक, नयनरम्य महाल बांधल्याचा उल्लेख आहे.
बुरुजावरून सरळ चालत गेल्यावर एक हवेशीर बाल्कनी असलेला चौक लागतो. याच बाल्कनीच्या एका स्तंभावर देवनागरी लिपीतील शके १४६६ (इ. स . १५४४) च्या काळातील शिलालेख आहे. हा बुरुज बांधण्यासाठी दोन महिने लागले असा स्पष्ट उल्लेख यात आढळतो.


इथूनच पुढे निशाण बुरुज (हनुमान बुरुज) हा टेहेळणीच्या दृष्टीने महत्वाचा किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज आहे. इथून सिद्धेश्वर मंदिराचा परिसर नजरेत सामावता येतो. बुरुजावर चढताना अनेक खंडीत शिल्पे पहावयास मिळतात.


या बुरुजावरून सरळ चालत आता जिथून प्रवेशद्वार आहे, तिथे पोहोचता येते. बुरुजावरून खाली उतरल्यावर ब्रिटीशकालीन वास्तू आहेत. तसेच शिखराचे भग्न अवशेष, स्तंभ मांडून ठेवलेले आहेत. आता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहोर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. सध्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून डावीकडे आखाड्याच्या दिशेने आत गेल्यावर तटबंदीवर विविध प्रकारची शिल्पे पहावयास मिळतात. त्यात वीरगळ, विद्याधर पट, शिल्पपट आहेत असेच सरळ तटबंदीच्या कडेने चालत गेल्यास किल्ल्यातील एकमेव अशा अष्टकोनी बुरुजापाशी आपण येतो.
परत त्याच रस्त्याने मागे येऊन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.



किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने ९ ते ५ अशी प्रवेशाची वेळ आहे. बाग मात्र ७ वाजेपर्यंत चालू असते. सोलापूर, नळादुर्ग, परांडा, माचणूर , करमाळा, मंगळवेढा हे भुईकोट दोन तीन दिवसात पाहाता येतात.

पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर शहर रस्ता आणि रेल्वे मार्गाने इतर भागाशी जोडलेले आहे. सोलापूर रेल्वे आणि बस स्थानकातून रिक्षाने किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय :
सोलापूर शहरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात सध्या पाणी नसल्याने पाणी सोबत ठेवावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोलापूर शहरात जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे.
जाण्या

रविवार, २० मे, २०१८

किल्ले-राजगड (३७)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺🌺*किल्ले राजगड* 🌺🌺
किल्ल्याची ऊंची : 1394
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
किल्ले राजगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी
गडांचा राजा, राजियांचा गड
राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन् भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.
इतिहास :राजगडा संबधीचे उल्लेख
१)‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला‘.
- जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो ‘राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दर्याखोर्यातून आणि घनघोर अरण्यातून वार्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.‘
३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु ? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर बारा कोसांचा, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते
इतिहासातून अस्पष्टपणे येणार्या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर ज्ञात आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.
राजगडाचे पूर्वीचे नाव होते "मुरंबदेव". हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.
इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज उपलब्ध नाही. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली‘.
सभासद बखर म्हणतो की,
‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे‘.
सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचे गाव होते, तेथे रान फार होते. त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.
सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.
शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे
‘सत्तावीस किल्ले तांब्रास दिले निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला‘.
शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले. यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती. त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली. आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला.
जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ’कानद खोर्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ’ असा आदेश दिला होता.
११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वत: औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले, पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच, त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड‘ असे ठेवले.
२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.
पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते.(राजवाडे खंड १२) यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले होते. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबतपवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.


पहाण्याची ठिकाणे :पद्मावती तलाव :
गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे.

रामेश्वराचे मंदिर:
पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा:
रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.

सदर:
ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

पाली दरवाजा:
पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत.पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो.

गुंजवणे दरवाजा:
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.

पद्मावती माची:
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.

पद्मावती मंदिर :
सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.

संजीवनी माची:
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायर्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

आळु दरवाजा:
संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.

सुवेळा माची:
मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव "सुवेळा" असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.
माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला "डुबा" असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसर्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेट किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला "मढे दरवाजा" असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्वरी बुरुज आणि परिसर:
सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्याकडे जाणार्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

बालेकिल्ला:
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.
दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला "उत्तर बुरुज" असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा :१) गुप्त दरवाजाने राजगड :-
पुणे - राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

२) पाली दरवाज्याने राजगड:-
पुणे - वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे "पाबे" या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायर्याची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

३) गुंजवणे दरवाज्याने राजगङ :-
पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील "मार्गासनी" या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४) अळु दरवाज्याने राजगड:-
भुतोंडे मार्गे आळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची:-
गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते.
राहाण्याची सोय :१) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :पायथ्या पासून ३ तास लागतात.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
*शंकर शिंदे*
9⃣4⃣2⃣3⃣0⃣3⃣9⃣6⃣8⃣3⃣
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम* *व*
*सोशल मीडिया व इंटरनेट*

वरील माहिती देण्याचा हेतू फक्त🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, १८ मे, २०१८

किल्ले-निमगिरी (३६)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹. गडकोट महाराष्ट्राचे
🌺🌺 किल्ले निमगिरी🌺🌺
किल्ल्याची ऊंची : 3460
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: नाणेघाट
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या पायर्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते.
निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात.
हनुमंतगड(निमगिरी) ची माहिती याआधीच दिलेली आहे.
पहाण्याची ठिकाणे :निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदनातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढुन गेल्यावर शेतजमिनीचे तुकडे आहेत. या टप्प्यावर पायवाट सोडून डाव्या बाजूला गेल्यावर उघड्यावर असलेली एक सुंदर मुर्ती आणि मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्याच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाक आहे.पुन्हा पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मुर्ती, पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. थोडे पुढे चढुन गेल्यावर एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे. त्यावर शिल्प कोरलेल आहे. पुढे थोड्याच अंतरावर ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यातील काही वीरगळींवर शिलालेख कोरलेले आहेत. काही वीरगळींवर खंडोबाचे शिल्प कोरलेला आहे.
वीरगळी पाहून खिंडीच्या दिशेने निघायचे अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. या गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या आहेत. इथून कातळात खोदलेल्या पायर्यांची आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव या पायर्यांच्या साहाय्याने आपण १० मिनिटात निमगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
किल्ल्याच्या पायर्या चढताना एक वाट डावीकडे गेलेली दिसते इथे टेहळणीसाठी एक गुहा बनवलेली आहे. पण वाट तुटल्यामुळे गुहेपर्यंत जाता येत नाही. हनुमंतगडावरुन ही गुहा दिसते. निमगिरीच्या उध्वस्त प्रवेशव्दाराच्या बाजूला पहारेकर्यांसाठी गुहा कोरलेली आहे. गडमाथ्यावर गेल्यावर उजव्या बाजूने गडफ़ेरीस सुरुवात करावी. प्रथम २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून थोडे चालून गेल्यावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत. पुढे गेल्यावर एक गजलक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिरा समोर खराब पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांपासून वरच्या दिशेला चढत गेल्यावर ३ समाध्या पाहायला मिळतात. समाध्या बघुन परत टाक्यांपाशी येऊन पुढे गेल्यावर ५ गुहा आहेत. शेवटच्या गुहेत एक पाण्याच टाक आणि आतमध्ये एक खोली आहे. यापैकी एका गुहेत ५ ते ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्र्यांचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो.
किल्ला उतरतांना वीरगळींपाशी येउन उजव्या बाजूस चालत गेल्यावर काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी एकदम योग्य जागा आहे. मंदिराच्या मागे २ वीरगळी आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :निमगिरीला जायचे असल्यास कल्याण - मुरबाड मार्गे नगर; आळेफाटा किंवा जुन्नर अशी कुठलीही एसटी पकडावी. पुण्याहून येणार्यांना जुन्नर शिवाय पर्याय नाही. माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचे गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी - मढ मार्गे खांडीपाड्यार्पंत जातो. हाच रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून खांडीपाडा ७ किमी वर आहे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. खांडीपाड्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. एसटीची बस जुन्नरहून १ किमीवरील निमगिरी गावापर्यंत येते. तेथुन चालत खांडीपाड्यापर्यंत जावे लागते.
निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदनातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. पुढे एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आणि समोरच ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. तेथुन खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्यांची आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव या पायर्यांच्या साहाय्याने आपण १० मिनिटात निमगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
राहाण्याची सोय :काळुबाई मंदिरात १०, किल्ल्यावर गुहेत ६ लोक राहू शकतात.जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :खांदेपाड्यापासून १ तास लागतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संकल्पना*
शंकर इंगोले
वरील माहिती देण्याचा हेतू फक्त. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, १६ मे, २०१८

किल्ले-मल्हारगड (सोनोरी) ३५

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

किल्ले मल्हारगड (सोनोरी)
किल्ल्याची ऊंची : 3100

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: भुलेश्वर,

पुणेजिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ’मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.


मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धापाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, लक्ष्मी - नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पहाण्यासारख्या गोष्टी आहेत.


मल्हारगड हा छोटेखानी किल्ला, पानसे (वाडा) गढी, लक्ष्मी - नारायणचे व मुरलीधराचे मंदिर हि ठिकाणे मुंबई - पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.

इतिहास :या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम १७५७ ते १७६० या काळात झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.

पहाण्याची ठिकाणे :पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे, मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरीं प्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात उतरण्यासाठी पायर्या बांधलेल्या अहेत. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बालेकिल्ल्याच्या तटाला लागून आहे. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.


तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.


चोर दरवाजापासून बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. बालेकिल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात रहायचे झाल्यास फारतर ५ ते ६ माणसे दाटीवाटीने राहू शकतात.


पानसे (गढी) वाडा :- पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गढी मल्हारगडच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे. गढीचे १२ फूटी उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. गढीला ६ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची जाडी ९ फूट व उंची १९ फूट आहे.


गढीत शिरल्यावर प्रथम लक्ष्मी - नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरात कोरलेली लक्ष्मी - नारायणाची मुर्ती आहे. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.


मंदिराच्या मागे असलेल्या विहिरिच्या बाजूला पानसे यांचा आहे. या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व दिंडी दरवाजा असलेले लाकडी प्रवेशव्दार आहे. पानसे यांचा तीन मजली वाडा होता, आता केवळ एक मजली राहीला आहे. वाड्यातील शिसवी देवघर पहाण्या सारखे आहे. दरवर्षी या वाड्यात जम्नाष्ट्मीचा (कृष्ण जन्माचा) उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वाड्याच्या समोरील बाजूस घोड्याच्या पागा होत्या.


पानसे यांचा वाडा पाहून लक्ष्मी - नारायणाच्या मंदिराला वळसा घालून प्रवेशव्दाराच्या विरुध्द दिशेला चालत गेल्यावर ढासळलेली तटबंदी दिसते. येथे गढीचा दुसरा दरवाजा होता. (गावकर्यांनी यातूनच रस्ता काढलेला आहे.) या तटबंदीत रस्त्याच्या डाव्या बाजूस गणपतीचे मंदिर आहे. ते पाहून मागे फिरून गढीच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते.


सोनोरी गावात मुरलीधराचे मंदिर आहे. मंदिरात काळ्या पाषाणातील श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे.


पोहोचण्याच्या वाटा :मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने दोन वाटांनी जाता येते.

१) सासवडहून :-

सासवड पासून ६ किमी वर ’सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटी सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स १०, दु २ आणि संध्या ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रत्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्या पर्यंत जाता येते. किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या खिंडीत इलेक्ट्रीकचे टॉवर आहेत. टॉवरच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते. या वाटेने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जातो.(गडाचे प्रवेशव्दार सोनोरी गावाच्या विरुध्द बाजूस आहे.) . पायथ्या पासून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.


२) झेंडेवाडीतून :-

पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर काही वेळाने ’झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. येथून २ किमी वर झेंडेवाडी हे गाव आहे. या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसते. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे आपल्याला बिलकुल दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगररांगेमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.

राहाण्याची सोय :फक्त ५ ते ६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणार्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते.

जेवणाची सोय :किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. सासवडला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय :गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :१) सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो. २) झेंडेवाडीफाट्या पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास दीड तास लागतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम*

वरील माहिती देण्याचा हेतु.

मंगळवार, १५ मे, २०१८

किल्ले—जीवधन ३४

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌺🌺किल्ले जीवधन🌺🌺

किल्ल्याची ऊंची : 3754

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: नाणेघाट

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता.

इतिहास :शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्व:त… वजीर बनले. गाव गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे

पहाण्याची ठिकाणे :गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.

पोहोचण्याच्या वाटा : १ कल्याण - नगर मार्गे :-

कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते.

२ जुन्नर - घाटघर मार्गे :-

गडावर जाणारी दुसरी वाट जुन्नर - घाटघर मार्गे राजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. हि वाट अत्यंत सोपी आहे.

राहाण्याची सोय :गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत:…च करावी.

पाण्याची सोय :गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ :घाटघर गावातून जीवधनवर जाण्यास २ तास लागतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम*
वरील माहिती देण्याचा हेतू फक्त .

रविवार, १३ मे, २०१८

किल्ले-घनगड ३३

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *गडकोट महाराष्ट्राचे*

⛳⛳⛳ *किल्ले घनगड* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 3000

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: सुधागड

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.

१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.

२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.

घनगड किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.

पहाण्याची ठिकाणे :एकोले गावातून मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते. या पायवाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक वाट झाडीत जाते. येथे पूरातन शंकर मंदिराचे अवशेष आहेत.त्याबरोबर शिवपिंड, नंदी ,वीरगळ व काही तोफगोळे पहायला मिळतात. हे मंदिराचे अवशेष पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत. मंदिरापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो.


प्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. यात ४-५ जणांना रहाता येईल. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे. गुहेच्या खालून पुढे गेल्यावर एक अरूंद निसरडी पायवाट कातळकड्याला वळसा घालून पुढे जाते. या वाटेच्या शेवटी कातळात कोरलेले टाक पहायला मिळते. ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते.


शिडी चढून गेल्यावर कड्याला लागून कातळात कोरलेल्या पायर्यांची पायावाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीच्या वरच्या भागात पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा आहे. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीली २ टाकं खांब टाकी आहेत. तिसर टाक जोड टाक आहे. चौथ टाक छोट असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


टाकी पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पायवाटेच्या वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. येथून १५ पायर्या चढून गेल्यावर आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे. त्याच्या वरच्या बाजूला पायर्या असलेल पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे डोंगराच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. त्यात तोफेसाठी झरोके आहेत. हा बुरुज पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.


किल्ल्यावर "शिवाजी ट्रेल" या संस्थेने अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते.


खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऍम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ :एकोले गावातून घनगडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.सूचना :१) मुंबई - पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास घनगड व कोरीगड हे दोनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.

२) कोरीगडाची माहीती याआधीच दिलेली आहे.

३) पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे घनगडावर जाणे टाळावे. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*संकल्पना*

*शंकर इंगोले*. ९८२२७९७०५९

*माहिती स्रोत*

*ट्रेकक्षितिज.कॉम*

वरील माहिती देण्याचा हेतू फक्त .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १२ मे, २०१८

किल्ले-चावंड ३२

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺गडकोट महाराष्ट्राचे

⛳⛳⛳ *किल्ले चावंड* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 3400

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: नाणेघाट

जिल्हा : पुणे

श्रेणी : मध्यम

चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड।।

गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला।।


जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

इतिहास :१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले, त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले, त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.


२) दुसरा बुह्राण निजामशाह (इस १५९०-१५९४) हा सातव्या निजामाचा नातू . बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता


३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.


४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की,. त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.


५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत;


चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत


चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे


प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव


मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला.

-:संदर्भ अहमदनगरची निजामशाही


मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकार्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले.

-: संदर्भ गुलशने इब्राहिमी


आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे, हे सिद्ध झाले निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला, राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.


१) जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन


२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन


३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन


४) चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा. असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौखिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.


५) चामुंडा हे देवीचे क्रूर रूप , या रुपात सर्व काही भयानक, अमंगल ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.


६) सप्त मातृका म्हणजे ब्राम्ही, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते.

संदर्भ देवी भागवत

पहाण्याची ठिकाणे :दरवाजातून आत जाताच, दहा पायर्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५ - २० पायर्या चढून गेल्यावर, काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बर्याच वास्तू दिसतातजवळ (जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश इथे आहेत) , म्हणून असा निष्कर्ष काढता येइल की इथे मोठी वस्ती असावी.आजुबाजुच्या परीसराचा मुलकी कारभार या गडावरुन चालत असावा.जेथे चौथरा शिल्लक आहे, तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत.


येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही.येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १० -१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत, ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत.


गडाच्या याच भागात बर्यापैकी तटबंदी असून, आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्याचे दगड गडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. इशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.


यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या किमीच्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.


गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी . जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.


एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५ - ६ किमीचा परीघ असावा. गडाच्या इशान्येस असणार्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बर्याच दंतकथा प्रचलित आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेट द्यायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.



पोहोचण्याच्या वाटा :मुंबई - कल्याण - माळशेजघाट - जुन्नर हे अंतर १६० किमी आहे. जुन्नरहून १५ किमीवर चावंडवाडी हे चावंड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर खडकात खोदलेल्या पायर्यां लागतात. गडावर जाण्यास पायथया पासून १.३० तास लागतो.


गडावर जाणार्या पायर्या अगदीच छोट्या आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायर्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायर्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायर्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायर्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे.५

राहाण्याची सोय :गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जणांना राहाता येइल, इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.

जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही ,मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय :गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :चावंड गावापासून १ तास लागतो.

🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

*संकल्पना*

*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, ११ मे, २०१८

किल्ले - विसापुर ३१


⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
⛳⛳⛳ *किल्ले विसापूर* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची :  3038
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
 मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा हा विसापूर किल्ला, लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. 
इतिहास :विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. 
पहाण्याची ठिकाणे :पायर्‍यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे. 
पोहोचण्याच्या वाटा :मुंबई - पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहोचतो येथे बाजूलाच एक मंदिर आहे. 
२) दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
३)मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे. 
राहाण्याची सोय :गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत. 
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.
पाण्याची सोय :गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :भाजे गावातून अडीच तास लागतो.
सूचना :विसापूर व भाजे लेणी एका दिवसात व्यवस्थित पाहून होतात.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम* *

 वरील माहिती देण्याचा हेतू फक्त महाराष्ट्रातील गडकोटाचा वैभवशाली इतिहास *फक्त भटकंती* समूहातील मित्रांना माहीत करणे.

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...