हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ मे, २०१८

किल्ला-चावंड ०८

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे*

⛳⛳⛳ *किल्ले चावंड* ⛳⛳⛳

चावंड किल्ला - चावंड किल्ल्याची माहिती,


३४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे . पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो .

चामुंडा अपभ्रंशे चावंदा जयावरी सप्तकुंड ॥

गिरी ते खोदूनी अश्मखंड ।

प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ॥

जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे . गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे . नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि .मी च्या आसपास चावंड वसलेला आहे . चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे .

इतिहास :

सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंडचे नाव आहे . बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले .

दुसरा बुऱ्हाण निजामशाह ( इ.स . १५९० - १५९४ ) हा सातवा निजा , याचा नातू बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.

१६२६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला . त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला .

मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड , हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले . महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले .

या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत - चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत . चुंड - हे निजामशाही आमदानातील नाव अहे. प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदारच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला .

अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारपुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांनी मान झुकवली नव्हती . त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले . ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड , तुंग, कोआरी , तिकोणा , पुरंदर , भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले .

गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला . निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले . त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली . चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या, मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले . पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले .

निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला . मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला . त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले . मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला.चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली .

जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन .

जे किल्ले बौद्ध , जैन लेण्यांनी अलंकृत आहेत प्राचीन

जे किल्ले शैव , शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन .

चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे . म्हणून तो शाक्त पंथासी निगडित आहे .चावंड निजामशाहीत जाण्याअगओदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते . येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल .

चामुंडा हे देवीचे क्रूर रूप . या रुपात सर्व काही भयानक अमंगल , ही देवी बंगाल , बिहार, उत्तर प्रदेश , राजस्थान येथीला आहे . हाडकुळी, जीभ बाहेर , उभे केस, मुंडांच्या माळा , हाडांचे दागिने , व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य . हिचे वाहन गाढव , प्रेत , घुबड, गिधाड, ध्वजावर अग्णीपुराणाप्रमाणे चार हात, शक्ति , मुंड , शूळ ही हिची आयुधे .

सप्त मातृका म्हणजे - ब्राम्ही, महेश्वरी , कौमारी, वैष्णवी , वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. (संदर्भ – देवी भागवत .)

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागता . वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते , तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे . उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५ -२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात . एका वास्तूचा चौथरा अजून शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे . मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे .

बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते . हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १० - १५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७ - ८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत .

ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे . यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे . म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे . ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते . ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे , तिथे चिऱ्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत.

हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे . गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीच बांधकाम आढळते . या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते. यापुढे आपन गडाच्या पूर्वेस येतो . या भागात कोणतेह अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही.

हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे . जवळ जवळ अर्ध्या कि .मी. च्या परिसरात एकही बांधकाम आढलत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते . इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा ताटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो. मंदिर पाहायला गडाच्या सर्वात उंच भागात चामंडा देवीचे मंदिर आहे . मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे .

आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते . याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे . ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे. एकंदरीत पाहता . गडाचा घेरा विस्तीर्ण आहे . साधारण ५ - ६ कि .मी. चा व्यास असावा.

गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे . या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडवर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे . सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे , पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल . या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला . पण ते सफल झाले नाहीत . आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत त्यांना भेट द्यायला , तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो , तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

गडावर जाण्याच्या वाटा :

गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे . चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे . या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो . ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते . पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोट्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे .

साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २१ /२ फूट लांबीची आहे . जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे . या तोफेची लांबी साधारण ३ ते २१ /४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात. या पायऱ्या अगदीच छोट्या आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वसत करून टाकण्याचा प्रयत्न केला . तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २० - २५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत. ज्यावर आज रानगवत माजलेले आहे .

वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे . यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे . उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे . गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे . दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे .

गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात , तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदिर त्रास देऊ शकतात . चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते . गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते . गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे . गडावर जाण्यासाठी चावंड गावापासून १ तास लागतो .

🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

किल्ले-सिंधुदुर्ग (०७)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ गडकोट महाराष्ट्राचे



⛳⛳⛳ *किल्ले सिंधुदुर्ग* ⛳⛳⛳


सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोकणपट्यातील सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण या गावाजवळ अरबी समुद्रात आहे. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. इ.स १६६४ रोजी बांधण्यास सुरवात केली. अतिशय भक्कम व बळकट असा हा किल्ला आहे. या किल्याच्या जागेची पाहणी व गडाच्या बांधणीचे काम महाराजाचे निष्टावंत सेनापती हिरोजी इंदुलकर या कुशल बांधकामवीराने जवळील कोळीबांधवांच्या मदतीने पूर्ण केले. या बांधणीसाठी जवळ ३ वर्षाचा कालावधी लागला.शत्रूंकडून किल्ल्याच्या बांधकामास व्यत्य येऊ नये यासाठी महाराजांनी जवळपास ४ ते ५ हजार मावळ्याची फौज तनात केली. चैत्र शुद्ध पूर्णिमा शके १५८९ म्हणजे २९ मार्च १६६७ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी महाराजांना तोफांची सलामी दिली गेली व आजूबाजूच्या गावांमध्ये साखर वाटण्यात आहे होती. व या गडाची निर्मितीमुळे महाराजांनी पश्चिम सागरवर आपले साम्राज प्रस्तापित केले.

ह्या किल्ल्याचा तटबंदीचा विस्तार तीन-साडेतीन किलोमीटर इतका आहे व तटबंदीची उंची ३० फुट इतकी आहे गडावर बुरुजांची संख्या ५२ च्या जवळपास आहे व या बुरूजांवर चढण्या-उतरण्यास दगडी जिने बांधण्यात आले आहेत या जिन्याची संख्या ४५ इतकी आहे. गडाचा विस्तार ४८ एकरात कुरटे या काळ्या दगडावर आहे.

सिंधुदुर्ग किल्लाचा इतिहास

शिवाजी महाराजाच्या दुरर्दुर्ष्टीपणाची साक्ष देणारा हा सिंधुदुर्ग किल्ला आहे . जेंव्हा शिवाजी महाराज आपल्या स्वराजाचे प्रास्थान कोकण भागात पसरवत होते त्यावेळी त्यांनी सागरी शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी भूदलाबरोबर जलदलाचे व सागरी किल्ल्यांचे निर्माण करायचे ठरवले व त्यासाठी आरमारची व सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला कुरटे नावाच्या काळ्या खडकाच्या बेटावर बांधण्यात आला आहे. खुद्ध शिवाजी महाराजांनी या गडाची पायाभरणीची मुर्तमेढ रोवली. त्या जागेला "मोरयाचा दगड" असे म्हणतात. सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण करण्यासाठी १ कोटी होणा चा खर्च आला. ज्या कोळी बांधवानी किल्ल्याची ही जागा शोधून काढली त्यांना गावे इनामात दिली गेली.

सिंधुदुर्ग किल्लावर पाहण्यासारखे ठिकाणे:

सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय सुंदर व नयनरम्य ठिकाणी आहे . मालवणच्या किनारपट्टीवर ह्या किल्ल्याकडे बोटीतून जाताना एक अविस्मरणीय असे दर्शन घडते. बोट तुम्हाला अगदी बुरुजाच्या तटबंदीपर्यत नेऊन सोडते. तटबंदीचे अनोखे बांधकाम आपणाला इथे पहावयास मिळेल. किल्ल्याच्या आत मध्ये नारळाचा झाडांची एकप्रकारे रास मांडल्या सारखी वाटते. किल्ल्याच्या तटबंदी वरील बुरजांचे बांधकाम पाहण्यायोग्य आहे या बुरुजांवर टेहाळणी , तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या आहे .

महादरवाजा :- वक्राकार आकराच्या तटबंदीतून आत गेल्यावर आपणाला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. हा दरवाजा शिवकालीन दुर्गरचनेचा गोमुख दरवाजा आहे. महादरवाजात आपणाला एक भग्नावस्थेतील तोफ पहावयास मिळेल तसेच दरवाजावर नगारखाना आहे दरवाजासमोर एक छोटेसे हनुमानचे मंदिर आहे त्यात श्री गणेशची हि मूर्ती आहे. हा दरवाजा आज हि तितकाच मजबूत व व्यवस्थित आहे.

जरीमरीचे देऊळ:- महादरवाजातून आत गेल्यावर आपणाला पश्चिम दिशेला हे जरीमरी देवीचे छोटेखानी मंदिर दिसते. त्या वर एक शिलालेख आहे ज्याचा मध्ये १८८१ मध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. आतमध्ये पादुकाची एक मूर्ती आहे.

किल्ल्याची तटबंदी :-

किल्ल्याला जवळ-जवळ तीन-साडेतीन किलोमीटर इतकी भक्कम व मजबूत तटबंदीचा घेराव आहे. हि तटबंदी जवळपास ३ मीटर रुंद आहे. तटबंदी हि वळणावळणाची आहे. पश्चिम व दक्षिणकडील तटबंदीच्या पायात शिशाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हि तटबंदी सागरी लाटांचा व बेफाम वाऱ्याचा सामना करत ४०० दशकापासून मजबूत अशी उभी आहे. असे म्हणतात फक्त तटबंदी बांधण्यासाठीच ८० हजार होणाचा खर्च आला होता.

तटबंदीवरील घुमट्या :- तटबंदीवरून फिरत असतांना आपणाला या दोन घुमट्या पहावयास मिळील ह्या जागेला आपण शिवप्रेमीचे हे प्रेरणास्थान व आदरस्थान म्हणू शकता. ज्या वेळी गडाच्या बांधकामाची पाहणी करण्यास शिवाजी महाराज गडावर आले होते त्या वेळी चुन्याच्या घाणी चलू होत्या त्या वेळी ओल्या चुन्याच्या लाधिवर महाराजाच्या डावापायाचे व उजव्या हाताचे ठसे उठवण्यात आले होते. व त्या वरच ह्या घुमट्या उभारण्यात आल्या आहेत शिवाजी महाराजाच्या या ठ्सांचे दर्शन घेऊन शिवप्रेमीचे उर भरून येते.

श्री शिवराजेश्वरांचे मंदिर :- हे मंदिर गडाच्या अगदी मधोमध असे भव्य मंदिर आहे हे शिवाजी महाराजाचे एकमेव मंदिर आहे याची बांधणी १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांनी केली. इथे आपणाला महाराजांची पाषाणातील चांदीच्या व सणासुधीत सोन्याच्या मुखवटा असलेली मूर्ती पहावयास मिळेल. तसेच शिवरायाची चार फुटाची तलवार हि आपणाला या मंदिरात पाहावंस मिळेल.

महादेवाचे मंदिर:- गडाच्या पश्चिमला गेल्यावर आपणाला महादेवाचे मंदिर दिसेल या मंदिराचे वैशिष्ट मंदिराच्या आत एक चौकोनी आकाराची खोल अशी बारव आहे. मंदिरात नंदी समोर असेलेले महादेवाचे शिवलिंग आहे .

विहिरी:- सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रात असून या किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या खोल अशा विहिरी आहेत. व हे चमत्कारिक वाटते. दुध बाव , दही बाव व साखर बाव हि विहिरीची नावे आहेत. प्रत्येक विहिरीला चौकोनी आकाराची तटबंदी आहे. या विहीरचा वापर गडावरील लोक पिण्याच्या पाण्यासाठी करतात. दही बाव व साखर बाव जवळ जवळ आहे दुध बाव राजवाड्याच्या अवशेषाजवळ आहे .

भवानी मातेचे मंदिर:- भवानी माता हि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे त्यामुळे महाराजांनी बांधलेला जवळपास सर्व किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे . या गडावरची भवानी मातेचे उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात तलवार असेली पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. व तिचे मंदिर कौलारू आहे.

गडापर्यत कसे पोचाल ?

मुंबई-गोवा महामार्गावरून आपण मालवण गावात पोचावे तिथून आप पण बोटीच्या साह्याने गडावरती पोचावे.

गडावरती खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे.

🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙

किल्ला-सिंहगड ०६

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

 *गडकोट महाराष्ट्राचे*


⛳⛳⛳ *किल्ले सिंहगड* ⛳⛳⛳

सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे या जिल्यातील एक किल्ला आहे . पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगामध्ये वसलेला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून ४४०० मीटर इतकी आहे . हा गिरिदुर्ग या प्रकारचा किल्ला आहे . हा किल्ला एकदम मोक्याच्या ठिकाणी असून या किल्लावरून आपणाला तोरणा , राजगड ,लोहगड , विसापूर , पुरंदर , तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते. हा गड ट्रेकिंगसाठी उत्तम आहे व याची चढाई सोपी आहे .

सिंहगड किल्ला इतिहास

सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा असे होते. हा किल्ला पहिल्यांदा आदिलशाहीकडे होता तेथे दादोजी कोंडदेव हे सुभेदार होते. हा गड शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिला होता.त्या गडावर उदेभान राठोड जो एक राजस्थानातील राजपूत होता नंतर त्याने धर्मांतर केले तो येथे मोगलांच्यातर्फे कोंढाण्याचा सुभेदार होता.

शिवाजी महाराजांनी या गड परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसुरे या आपल्या विश्वासू व निष्ठावंत सेनापती ज्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन मोहीमवर जाण्यास तयारी दर्शवली. जेंव्हा शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेना मोहीमवर न जाण्याचे सुचवले कारण मालुसरेच्या मुलाचे लग्नकार्य होते तेव्हा तानाजी मालुसरे उद्गारले " आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे " व आपल्या ५०० मावळ्यांसह या गडावर आक्रमण करावयास गेले. ह्या लढाई दरम्यान तानाजी मालुसुरे यांना वीरमरण आले. तीच लढाई पुढे सूर्याजी मालुसुरे जो तानाजी मालुसुरेचा भाऊ होता त्याने विजयी करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला.या लढाईतील शेलारमामा यांचे नावही मोठ्या इतबिने घेतले जाते.

ज्यावेळी शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याची व तानाजी मालुसुरेच्या बलिदानाची माहिती समजता छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले "गड आला पण सिंह गेला" यानंतर या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आहे असा इतिहास सांगतो.

सिंहगड किल्लावर पहावयास मिळेल :-

या गडावर दूरदर्शनचा एक उतुंग असा टॉवर आहे.

पुणे दरवाजा :- आपण गड चढून वर गेलानंतर आपण या भव्य प्रवेशद्वाराजवळ पोचतो हा दरवाजा बुलंद व बळकट वाटतो. दरवाजातून आत आल्यावर आपणाला दारूचे कोठार ,घोड्याच्या पागा , प्राचीन टाके पहावयास मिळेल.

कल्याण दरवाजा :- कल्याण दरवाजा हा गडाच्या पश्चिमेला म्हणजेच राजगड,तोरणा या किल्याच्या दिशेला आहे . कल्याण गावातून वर आल्यावर आपण या दरवाजातू आत प्रवेश करता. ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरजावर हत्ती व माहूत याची कोरीव शिल्पे आहे .

देवटाके: – अमृतेश्वराच्या मंदिराजवळ हे देवटाके आहेत. यामध्ये पिण्याच्या पाणी उपलब्ध आहे. महात्मा गांधी ज्यावेळी पुण्यात येत तेव्हा याच देवटाकेतील पाणी आवर्जून मागवत.

कोंढाणेश्वर मंदिर :- हे मंदिर महादेवाचे असून ते यादवकालीन आहे . हे यादवचे कुलदेवत होते. तसेच पुढे गेल्यावर अमृतेश्वर भैरव मंदिर पाहवयास मिळेल या मंदिरात आपला भैरव व भैरवी ह्या दोन मूर्त्या पहावयास मिळतील.

तानाजी मालुसुरे स्मारक :- ह्या गडावर आपणाला तानाजी मालुसरे या पराक्रमी योद्याचे स्मारक पहावयास मिळेल. इथे त्यांची एक मूर्ती जी तानाजी स्मारक समितीच्यावतीने बांधण्यात आली आहे. इथे आपला गडावरील काही इतिहासकार जे आपणाला सिंहगडाचा इतिहास पोवाड्यातून सांगतील.

डोणागिरी कडा :- यालाच तानाजीचा कडा असेही म्हणतात.याच कड्यावरून आपल्या घोरपडीच्या साह्याने दोरखंड टाकून गडावर आपल्या मावळ्यांना बरोबर आक्रमण केले.

तसेच

*गडावर अजून काय पाहाल ?*

झुंझार बुरुज, उदेभानाचे थडगे , राजाराम महाराजाची समाधि , लोकमान्य टिळकांचे निवास .

*सिंहगड किल्ल्यावरती कसे पोहचाल ?*

पुणे येथून सिंहगड किल्ला जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे . पुण्यातील स्वारगेट या बसस्थानकातून सिंहगडाच्या पायथ्यापर्यत जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहे. तसेच खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत.गडावर पायथ्यापासून पोहचण्यासाठी जवळपास २ तास लागतात.

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग जो कल्याण गावातून जातो तो थेट आपणाला कल्याणदरवाजापाशी नेतो.पुणे-कोंढणपूर या बसने कोंढणपूर गावात उतरून कल्याण दरवाजातून गडावर प्रवेश करू शकता.

दुसरा मार्ग पुणे दरवाजाकडे जातो तो खडकवासला धरणाच्या दिशेकडून आहे.गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाण्यास मार्ग उपलब्ध आहे.

गडावर राहण्याची सोय नाही आहे. पण खाण्याची व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे . इथे काही छोटे हॉटेल आहे व देवटाक्यायांमध्ये बारमाही पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय आहे.’

किल्ले-पुरंदर ०५

गडकोट महाराष्ट्राचे

⛳⛳⛳ *किल्ले पुरंदर* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 1500

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत, त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि.मी धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे, तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३ ते १४ मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला १९ - २० मैलांवर राजगड आहे.


पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे.किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे.गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे.एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत.गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.


पुरंदर किल्ल्यावर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात फुल फूलतात. सप्टेंबर २०१३ मध्ये ट्रेक क्षितिज संस्थेने ८४ फुलांची नोंद केली यात काही दुर्मिळ फुल तर काही केवळ पुरंदरवर आढळणारी फुल आहेत.


सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो. वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सुचना वाचाव्यात.)



१) सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत.

२) सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते दिलेले फोटो आयडेंटी संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो.

३) किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारने कार्ड जवळ असणे आवश्यक आहे.

उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी.

४) पुरंदर गडावरील काही ठिकाणे (कंदकडा, केदार दरवाजा, बावची माची) सुरक्षेच्या कारणावरून तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आली आहेत.

५) भैरवखिंड व वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

६) कास पठारानंतर पुरंदर किल्ल्यावर रानफुलांच वैविध्य पाहायला मिळते. पुरंदरवरील फूल पाहाण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडावर जावे.

७) पुरंदर व मल्हारगड हे किल्ले २ दिवसात पाहाता येतात.


इतिहास :अल्याड जेजुरी

पल्याड सोनोरी

मध्ये वाहते कऱ्हा

पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा ।


असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान अढळ आहे तसाच हा पुरंदर किल्ला. पुराणात या डोंगराचे नाव आहे ’इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत.


पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन हेमाडपंथी धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे. असे अनुमान निघते.


बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे त्यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला, त्यांनी पुरंदरच्या पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.


इ. स १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले, म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव त्यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते.


‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी त्यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले तसेच बहिले मारले.‘


मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,


‘अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो‘ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?‘ म्हणोन नीट खानावरी चालिला खानावरी तलवरीचा वार करावा. तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला‘.


खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ’पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले त्र्यांची नावे अशी,


१ पुरंदर २ रुद्रमाळ किंवा वज्रगड

३ कोंढाणा ४ रोहीडा

५ लोहगड ६ विसापूर

७ तुंग ८ तिकोना

९ प्रबळगड १० माहुली

११ मनरंजन १२ कोहोज

१३ कर्नाळा १४ सोनगड

१५ पळसगड १६भंडारगड

१७ नरदुर्ग १८ मार्गगड

१९ वसंतगड २० नंगगड

२१ अंकोला २२ खिरदुर्ग (सागरगड)

२३ मानगड


८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू त्यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.



पहाण्याची ठिकाणे :पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.


पुरंदर किल्ला :- या किल्ल्याला ३ माच्या (उत्तर, दक्षिण,बावची माची) आहेत. पुरंदरचा बालेकिल्ला ३ भागात (पूर्वेस कंदकडा, मध्यभागी राजगादी, पश्चिमेस केदारेश्वर) विभागलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नारायणपेठ गावातून डांबरी रस्ता व पायवाट आहे. डांबरी रस्त्याने आपण सैन्याने बनविलेल्या मुरारगेट या दरवाजापाशी पोहोचतो. तर पायवाटेने गडावर आल्यास आपण बिनी दरवाजापाशी पोहोचतो. दोन्ही मार्गाने गडावर प्रवेश केल्यास आपण पुरंदरच्या उत्तरेकडील माचीवर पोहोचतो. ही माची मुरारगेट ते भैरवखिंड अशी पसरलेली आहे. तर दक्षिणेकडील माची भैरवखिंड ते केदार दरवाजा अशी पसरलेली आहे. याखेरीज फत्ते बुरुजाखाली (केदार दरवाजाच्या पुढे खालच्या बाजूस) असलेल्या माचीस बावची माची म्हणतात.


मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर प्रथम "पद्मावती तळे" पाहायला मिळते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले चर्च आहे. चर्च वरून पुढे गेल्यावर "वीर मुरारबाजीचा पुतळा" आहे. (बिनीदरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यास उजवीकडे गेल्यावर वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो.) इ.स १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. पुतळच्या पुढे दुसरे चर्च आहे. चर्चच्या पुढे बिनी दरवाजा आहे.


बिनी दरवाजा :-

पुरंदर उत्तर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा कंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे पुरंदरेश्वर मंदिर, वज्रगडाकडे जातो, तर दुसरा रस्ता उजवीकडे वळून मुरारबाजी पुतळा, मुरारगेट कडे जातो.


आपण सरळ रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते. पुढे थोड्याच अंतरावर ’पुरंदरेश्वर’ मंदिर आहे. या मंदिराबाहेर एक चौकोनी विहिर आहे, तीला "मसणी विहीर" म्हणतात. या मंदिराजवळच कॅन्टीन आहे.


पुरंदरेश्वर मंदिर:-

हेमाडपंथी धाटणीचे हे महादेवाचे मंदिर आहे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटाची मूर्ती आहे. पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपर्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते.


राजाळे तलाव व भैरवखिंड :-

पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यावर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. या तलावाच्या पुढे पुरंदर व वज्रगड यांच्या मधील भैरवखिंड आहे. याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याची ठाणी असल्यामुळे भैरवखिंड व वज्रगडावर जाता येत नाही.


पेशव्यांचा वाडा (सवाई माधवरावांचे जन्मस्थान) :-

पुरंदेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथाने हा वाडा बांधला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. आजही ती सुस्थितीत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने या वाटेने वर जातांना एक सुकलेले टाक पाहायला मिळते. या वाटेने १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो.


दिल्ली (सर) दरवाजा व गणेश दरवाजा:-

हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेची देवळी व हनुमानाची मुर्ती आहे. हा दरवाजा व त्याच्या बाजूचे बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो.त्याला " गणेश दरवाजा" म्हणतात. या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस "बावटा बुरुज" आहे. येथे ध्वज लावला जात असे.

या दरवाजातून बाहेर पडल्यावर तीन वाटा फुटतात. समोरची वाट राजगादी, केदार दरवाजा व केदारेश्वर मंदिराकडे जाते. उजवीकडची वाट राजगादी उजवीकडे व माची डावीकडे ठेवत शेंदर्या बुरुजापर्यंत जाते. तिसरी वाट डावीकडे वळून दरवाजा संकुलाच्या वरून कंदकड्याकडे जाते. (सन २०१३ मध्ये कंदकड्याला जाणारी वाट भारतीय सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.)


कंदकडा:-

दरवाज्यातून बाहेर येऊन डावीकडे गेल्यावर एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो, हाच तो कंदकडा. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे बुरुजा जवळ एक आणि वाटेवर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत. कंदकडा बुरुजावरून भैरवखिंड व वज्रगड व्यवस्थित पाहाता येतात.

कंदकडा पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून उजवीकडे जाणारी वाट पकडावी, ही वाट राजगादी उजवीकडे व माची डावीकडे ठेवत शेंदर्या बुरुजापर्यंत जाते.


शेंदर्या बुरूज व बोर टाक :-

पद्मावती तळ्याच्या मागे वरच्या बाजूस, बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधलेला आहे, त्याचे नाव शेंदर्या बुरूज. शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला अशी कथा आहे. या बुरुजाच्या पुढे एक कड्याच्या टोकाला एक पाण्याचे टाक आहे त्याला बोर टाक म्हणतात. येथून समोरच्या टेकडीवरील केदारेश्वर मंदिर दिसते.


राजगादी :-

शेंदर्या बुरुज व बोर टाक पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून समोर जाणारी वाट पकडावी. या वाटेवर कही वास्तूंचे चौथरे व दोन पाण्याची टाकं पाहायला मिळतात. पुढे या वाटेला दोन फाटे फुटतात. एक समोरच्या टेकडीवरील राजगादीवर जाते, तर दुसरी राजगादीला वळस घाकून केदारेश्वर मंदिराकडे जाते. आपण प्रथम समोरच्या टेकडीवर (राजगादी) जाणार्या वाटेने वर चढावे. येथे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर दारू खान्याची वास्तू आहे. थोडे वर चढून गेल्यावर आपण राजगादी टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. येथे उजव्या बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीच्या केदारेश्वरकडील टोकावर तटबंदीत बांधलेले शौचालय आहे. हे सर्व पाहून पुन्हा आल्या वाटेने खाली उतरून राजगादीची टेकडी उजवीकडे व दरी डावीकडे ठेऊन केदारेश्वर मंदिराच्या दिशेने जावे.


केदार दरवाजा :-

या वाटेवरून पुढे गेल्यावर एकाखाली एक असलेली पाण्याची टाकी लागतात. पुढे एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून १० मिनिटे चालत गेल्यावर केदार दरवाजा लागतो. या वाटेवर वरच्या बाजूस दोन पाण्याची टाकी आहेत. केदार दरवाजाच्या खालच्या बाजूस बावची माची आहे.. (सन २०१३ मध्ये केदार दरवाजा व बावची माचीला जाणारी वाट सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.) या दरवाच्या वरच्या बाजूस "फत्ते बुरुज" आहे.


केदारेश्वर :-

केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागून १५ मिनिटे चालून गेल्यावर राजगादी व केदारेश्वर मंदिर यांच्या मधील खिंडीत येतो. केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे.या रुंद जिन्याने आपण थेट केदारेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात.

मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर किल्ल्यावरील अत्युच्च टोकावर आहे. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे. त्याला "कोकण्या बुरूज" असे नाव आहे. केदारेश्वर मंदिराजवळ केदारगंगेचा उगम होतो.

संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात नारायणेश्वराच प्राचीन देऊळ पाहाण्यासारख आहे.

पोहोचण्याच्या वाटा :पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.


१) सासवडहून सासवड - भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणार्या ’पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणार्या सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.


२) पुण्याहून ३० किमी अंतरावर असणार्या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. नारायणपूर हे गाव तेथील एकमुखी दत्त मंदिरामुळे प्रसिध्द आहे. नारायणपेठ गावातून गाडी रस्ता नारायणपेठ या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावा मार्गे थेट किल्ल्या पर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपेठ गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडी रस्ता, या रस्त्याने आपण २ तासात मुरारगेट पाशी पोहोचतो. (खाजगी वाहानाने थेट मुरार गेट पर्यंत जाता येते) तर दुसरी वाट म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट, या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहचतो.


राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. नारायणपूर गावात राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत:… करावी. पुरंदेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या कॅन्टीन मध्ये चहा - नाश्त्याची सोय आहे.

पाण्याची सोय :गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ :गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून १ तास लागतो.

🥗🥗🥗🥗🥗

किल्ले-नारायणगड ०४

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇🏇
⛳⛳ *किल्ले नारायणगड* ⛳⛳
किल्ल्याची ऊंची :  2557
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
नारायणगाव जवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड आहे. शिवनेरी किल्ला, जुन्नर ही बाजारपेठ आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग यांच्या जवळ असल्यामुळे नारायणगड किल्ला एकेकाळी महत्वाचा किल्ला असावा. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायर्‍या आणि टाक्यांवरुन किल्ल्याची बांधणी सातवहान काळात झाली असावी. किल्ल्या जवळ असलेल्या खोडद गावात उभारलेल्या Giant Metrewave Radio Telescope (GMRT) मुळे हा भाग पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आला. किल्ल्यावर जातांना आणि किल्ल्यावरून या टेलिस्कोप पाहायला मिळतात. मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहाता येतो.

पहाण्याची ठिकाणे :किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिरापासून सिमेंटने बांधलेल्या पायऱ्यानी १० मिनिटे चढल्यावर कातळ कोरीव पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्यांनी १० मिनिटे चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला टेकाड दिसतात. त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तामाता मंदिर आहे. मंदिरात गावकर्‍यांचा वावर असल्यामुळे मंदिरपर्यंत जाणारी पायवाट ठलक आणि मळलेली आहे. मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या दिशेला) एक पायवाट खाली उतरते. या पायवटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्याच टाक पाहायला मिळते. टाक पाहून परत हसतामाता मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. यात शरभ शिल्प कोरलेले दोन दगड आणि व्दारपट्टीवर कोरलेल्या गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे. वाडा पाहून परत पायवाटेवर येउन किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर असलेल्या हस्तामाता मंदिराकडे चालायला सुरुवात करावी. गावकऱ्यांनी हस्तमातेचे नविन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे. त्या सिमेंटच्या कळसाखाली देवीचे जुने दगडी मंदिर अजूनही शाबूत आहे . साधारण चार फुट उंच असलेल्या या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तामातेची मुर्ती आहे.

मंदिरात विश्रांती घेउन आल्या पायवाटेने खाली उतरुन गडावर प्रवेश केला त्या ठिकाणी यावे. आता समोरच्या बाजूला नारायणगडाचे दुसरे टेकाड दिसते. प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस जाउन (दरी डावीकडे व टेकाड उजवीकडे ठेवत) चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक खांब टाके दिसते. त्या टाक्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. या टाक्याला नारायण टाके अस नाव आहे . या टाक्याच्या पुढे जाणाऱ्या वाटेने दरीच्या बाजूस उतरल्यावर झाडीत लपलेला चोर दरवाजा पाहाता येतो. परंतु इथे जाणारी वाट झाडीत लुप्त झाल्याने स्थानिक वाटाड्या बरोबर असल्यास दरवाजा पाहाता येतो. दरवाजा पाहून परत पायवाटेवर येउन पुढे न जाता पुन्हा मागे नारायण टाक्यापाशी येउन पुन्हा किल्ल्यावर प्रवेश केला त्याठिकाणी यावे. तेथून टेकडी डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत थोडे चालत गेल्यावर पाच टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. ही टाकी मागे वळून प्रवेशव्दाराकडे येतांना किल्ल्याच्या डोंगराच्या कडेला, पायर्‍यांच्या वरच्या बाजूस एक टाक आहे. या टाक्यासमोर तटबंदीचे अवशेष आहेत. हे पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला संपूर्ण पाहाण्यास एक तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :मुंबईहून कल्याण, माळशेज मार्गे आळेफ़ाटा गाठावे. आळेफ़ाट्याहून दोन मार्गाने गडा पायथ्याच्या गडाच्या वाडीत जाता येते.
१) आळेफ़ाट्याहून पुण्याकडे जाणार्‍या रस्त्यावर वळल्यावर २ किमी अंतरावर नविन बांधलेला टोल नाका लागतो. तो पार केल्यावर कुकडी नदीवर बांधलेला पुल आहे. हा पुल पार केल्यावर लगेच डाव्या बाजूला एक छोटा रस्ता जातो. हा रस्ता कच्चा असून कालव्याच्या बाजूने जातो. पुढे नारायणगावाहून येणार्‍या रस्त्याला हा रस्ता मिळतो आणि गडाखालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. मुंबईहून नारायणगडाला जाणार्‍यांसाठी हा जवळचा मार्ग आहे. पण याचा बराचसा भाग कच्चा असल्याने पावसाळ्यात टाळावा. यामार्गाने आळेफ़ाटा ते मुकाई देवी मंदिर अंतर १६ किमी आहे

२) आळेफ़ाट्याहून नारायणगाव गाठावे. नारायणगाव एसटी स्थानका समोरुन एक रस्ता खोदडला जातो. या रस्त्याने ९ किमी अंतरावर एक चौक लागतो. येथून सरळ रस्ता खोडदला जातो तर डाव्या बाजूचा रस्ता गडाची वाडी मार्गे किल्ल्या खालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. यामार्गाने नारायणगाव ते मुकाई देवी मंदिर अंतर १०.५ किमी आहे. नारायणगावहून खोडदला जाणार्‍या एसटीने आल्यास चौकात उतरून गडाची वाडीमार्गे मुकाईदेवी मंदिरापर्यंत चालत जाण्यास अर्धातास लागतो.
राहाण्याची सोय :किल्ल्या खालील मुकाई देवी मंदिरात आणि किल्ल्यावरील हस्तामाता मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :नारायणगावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : मुकाईदेवी मंदिरापासून किल्ला चढण्यास ३० मिनिटे लागतात. जाण्यासाठी उत्तम कालावधी : किल्ला छोटा असल्याने वर्षभर जाता येते.
🌺🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सोमवार, ७ मे, २०१८

किल्ला-लोहगड ०३

 *गडकोट महाराष्ट्राचे
⛳⛳⛳ *किल्ले लोहगड* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची :  3400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
      पवना मावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे - मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुणे आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. याच डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.
इतिहास :लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
पहाण्याची ठिकाणे :गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. त्या प्रवेशद्वारांची नावे पुढील प्रमाणे:-
१ गणेश दरवाजा: ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२ नारायण दरवाजा: हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. या दरवाजाच्या दोनही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत.
३ हनुमान दरवाजा: हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

४ महादरवाजा: हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे.

महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथयात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे, तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली होती. हे तळं सोळा कोनी आहे . मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात.

लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते.
गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्या चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.

पोहोचण्याच्या वाटा : १ पूण्यावरून अथवा मुंबईवरून:-
पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणार्‍या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.


२ लोणावळ्याहून:-
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्‍या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून जीपने जाता येते. मात्र जीपचे भाडे १००० रु आहे.


३ काळे कॉलनीहून :-
काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडावाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

राहाण्याची सोय :लक्ष्मी कोठी मध्ये रहाण्याची सोय होते. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय :आपण स्वत: जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :१) भाजे गावातून २ तास लागतात. २) ल
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

किल्ला-इंदुरीचा(गढी) ०२

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे* 🏇🏇
⛳ *किल्ले इंदुरीचा किल्ला(गढी)* ⛳

किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची समाधी तळेगाव शहरातील पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.
मुंबई व पुण्याहून वर दिलेली तीनही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. 
इतिहास :छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. 
सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१ मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली, त्याला "इंदुरीचा किल्ला " ,सरसेनापतींची गढी" या नावानेही ओळखले जाते.
खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे.
पहाण्याची ठिकाणे :तळेगावहून चाकणला जातांना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. 

दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण दरवाजाच्या वरचा बाजूस जातो. येथे झरोके असलेला सुंदर हवामहाल आहे. याच्या छतावर कोरीव काम केलेले आहे. 
किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याची तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे.

भंडारा डोंगर :- तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे. या स्तुपावरून हि बौध्द लेणी हिनयान कालिन असावीत. लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे टाक आहे.
पोहोचण्याच्या वाटा :मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो.

भंडारा डोंगर :- मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ५ किमीवर डाव्या बाजूस भव्य कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. 
राहाण्याची सोय :रहाण्याची सोय तळेगावात आहे.
जेवणाची सोय :खाण्याची सोय तळेगावात आहे.
पाण्याची सोय :पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
सूचना :१) मुंबई व पुण्याहून इंदुरीचा किल्ला , बनेश्वर मंदिर, भंडारा डोंगर, चाकणचा किल्ला ही चारही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. 

२) चाकणच्या किल्ल्याची माहिती या आधीच दिलेली आहे.
🥗🥗🥗🥗🥗
*माहिती स्रोत*
*ट्रेकक्षितिज.कॉम* *व*
*सोशल मीडिया व इंटरनेट*

 वरील माहिती देण्याचा हेतू फक्त  ......

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...