हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० एप्रिल, २०१९

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*गडकोट महाराष्ट्राचे
*किल्ला क्र.६१*
⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 50

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले

डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : जळगाव

श्रेणी : सोपी

जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे.

इतिहास :
इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाई झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाला बोरी नदीच्या बाजूने दोन भक्कम बुरुज व तटबंदी आहे. त्यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बहादरपूर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात येते. पारोळ्या पासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे.

२) धुळे - जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही. आपण स्वत:च करावी.

सूचना :
अंमळनेर (२० किमी) - पारोळा (८ किमी) - बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहता येतात.

किल्ला-सिंदखेडराजा (६०)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳गडकोट महाराष्ट्राचे*
किल्ला क्र.६०*
⛳⛳⛳ *किल्ले सिंदखेडराजा* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बुलढाणा
श्रेणी : सोपी

सिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव जिजामातांचे जन्मस्थळ आहे . येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला होता . त्यामुळे हे स्थळ आता मातुलतिर्थ या नावाने ओळखले जाते . लखुजी जाधवांची गढीची देखभाल पूरातत्व खात्याने उत्तमप्रकारे ठेवलेली आहे . सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळात १०/- रुपयाचे तिकिट काढून गढीत जाता येते.


सिंदखेडराजा गावातील गढी , काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर , सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव आणि त्यांच्या पुत्रांच्या समाध्या , पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या ऐतिहासिक वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

इतिहास :
सिंदखेड येथे गवळी राजाची राजवट होती . त्याने गाई गुरांसाठी गावात काही तलाव बांधले . सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती . गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली . यातून मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला वाचली . ती दौलताबादला लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली . लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड परगणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी फौजेनिशी जाऊन रविरावचे बंड मोडून काढले . मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा कोणीही नसल्याने लखुजी जाधवाना १५७६ ला सिंदखेडची देशमुखी मिळाली . त्यानंतर सिंदखेडची भरभराट झाली . लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली , बाजारपेठा वसवल्या . निळकंठेश्वर रामेश्वर मंदिरांची दुरुस्ती केली .

लखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच १२ जानेवारी १५९८ या दिवशी गढीतील राजवाड्यात जिजाऊचा जन्म झाला . इसवीसन १६१० मध्ये शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह सिंदखेडराजा येथे झाला .

२५ जुलै १६२९ रोजी निजामाने लखुजी जाधव यांना दौलताबादेस बोलवले. लखुजी जाधव , पत्नी म्हाळसाबाई , भाऊ जगदेवराव , पुत्र अचलोजी , राघोजी व बहादूरजी , नातू यशवंतराव यांच्यासह दौलताबादला गेले.

लखुजी राजे दरबारात जाताच निजामाच्या मारेकऱ्यांनी लखुजी जाधव त्यांचे दोन पुत्र आणि नातू यांना ठार केले .
पहाण्याची ठिकाणे :
गढी सिंदखेडराजा गावात भर वस्तीत आहे . गढीच्या बाहेरच्या बाजूला बगिचा बनवलेला आहे . त्यात जिजामातेचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे . गढीचा प्रवेशद्वार भव्य आहे. गढीच्या भिंती १५ फुटापर्यंत दगडाने बांधलेल्या असून त्यावर विटांचे बांधकाम केलेले आहे. विटांच्या बांधकामात जंग्या ठेवलेल्या आहेत . प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत . त्यात सध्या पुरातत्व खात्याने अनेक मुर्ती, वीरगळ , जाती आणून ठेवलेल्या आहेत . हे सर्व पाहून गढीत प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याची भिंत दिसते . एकेकाळी हा राजवाडा दोन मजले उंच होता. आता मात्र त्याचे भग्नावशेष राहीलेले आहेत . पुरातत्त्व खात्याने उरलेल्या अवशेषांची योग्य डागडूजी केलेली आहे . गढीत शिरल्यावर उजव्या बाजूला गेल्यावर तटबंदीला लागून एक विहीर आहे . गढीतील पाण्याचा हा एकमेव स्त्रोत असावा. विहिर पाहून वाड्याच्या टोकापर्यंत चालत जावे . या ठिकाणी वरच्या बाजूला एक खोली आहे . ते जिजामाताचे जन्मस्थान आहे . या खोलीत जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा पुतळा बसवलेला आहे . वाड्याला तळघर आहे . तळघरात उतरण्यासाठी चार ठिकाणी जीने आहेत . वाड्याच्या मधल्या भागात सुंदर बगिचा केलेला आहे . तळघरात उतरणाऱ्या जिन्याने खाली उतरल्यावर कमानींवर तोललेला व्हरांडा पाहायला मिळतो. व्हरांड्याच्या एका बाजूला खोल्या आहेत. व्हरांड्यात आणि खोल्यान्मध्ये हवा आणि प्रकाश खेळता राहावा यासाठी झरोके केलेले आहेत . झरोक्यांची रचना अशाप्रकारे केलेली आहे की , प्रकाश आत येइल पण पावसाचे पाणी आत येणार नाही .

तळघर पाहून वाड्याच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर यावे . याठिकाणी जे अवशेष उरले आहेत त्यावरून येथे कचेरी किंवा दरबार हॉल असावा .

हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते. गावातील ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी गढीच्या समोर असणारा जालना रस्ता गाठावा . या रस्त्याने जालनाच्या दिशेने ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक गल्ली जाते . या गल्लीत शिरल्यावर थोडे पुढे उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात. चार बुरुज आणि तटबंदी असलेल्या या वास्तूला काळा कोट म्हणतात. तटबंदीच्या आत पुरतत्व खात्याने बनवलेले म्युझिअम आहे .

काळाकोट पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रंगमहाल आहे . या महालाची रचना चौसोपी वाड्यासारखी आहे . महालात शिरण्यासाठी प्रवेशव्दार आणि त्याच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. महालाचे लाकडी छत पुन्हा नव्याने बनवलेले आहे . महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी जीने आहेत . गच्चीवर पाण्याचा कोरडा हौद आहे . या हौदाच्या बरोबर खाली असलेल्या तळमजल्यावरील खोलीत शौचकूप आहेत.

रंगमहाल पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरा लागूनच एक बारव आहे. सजना बारव या नावाने ती ओळखली जाते . बारवेच्या काठावर ३ पिंडी आहेत. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर शेषशायी विष्णूची अप्रतिम मुर्ती आहे . मंदिराची रचना वाड्यासारखी असून त्यात विटानी बांधलेल्या कमानी सुंदर आहेत .

निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या अलीकडे शेताच्या कडेला काही समाध्या आहेत . याठिकाणी एक गणेशमुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. ऱामेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे . मंदिरावर फारसे कोरीवकाम नाही . मंदिराच्या आतील खांबावर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरात काही तुळशी वृंदावन आहेत .

रामेश्वराचे दर्शन घेउन त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर लखुजी जाधवांची , त्यांचे पुत्र आणि नातवाची भव्य समाधी आहे. समाधीच्या बांधकामात इस्लामी बांधकाम शैलीची छाप पडलेली आहे. समाधीच्या समोरच्या बाजूला छोट्या समाध्या आहेत .

वरील सर्व ठिकाणे पाहायला एक तास लागतो. पुन्हा आल्या मार्गाने मुख्य रस्त्यावर यावे आणि जालन्याच्या दिशेने चालायला सुरुवात करावी . साधारण १० मिनिटात उजव्याबाजूला एक तलाव आणि त्याच्या मधोमध पाण्यात बांधलेला एक छोटेखानी महाल दिसतो. तो चांदनी तलाव आहे.
त्याच रस्त्याने १ किलोमीटर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका तलावाची भिंत आणि त्यात बनवलेला महाल दिसतो. या तलावाला मोती तलाव या नावाने ओळखले जाते. महाल दोन मजली असून खालचा मजला पाण्याच्या पातळीच्या थोडा वर आहे . महालाचे सज्जे तलावाच्या बाजूला काढलेले आहेत . तलावात उतरण्यासाठी महालात जीने आहेत.

या तलावांबरोबरच गावात पुतळा बारव नावाची अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुरसुंदरीच्या मुर्तीमुळे ही बारव पुतळा बारव या नावाने ओळखली जाते .

सिंदखेडराजा मधील ही सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
सिंदखेडराजा रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. सर्व महत्वाच्या शहरातून सिंदखेडराजाला एसटीच्या बसेस जातात. सिंदखेडराजाहून जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे . जालन्याहून एका तासात सिंदखेडराजाला पोहोचता येते .
राहाण्याची सोय :
सिंदखेडराजा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.

किल्ला-देवगिरी (५९)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*गडकोट महाराष्ट्राचे* *किल्ला क्र.5    



⛳⛳⛳ *किल्ले देवगिरी* ⛳⛳⛳
किल्ल्याची ऊंची : 2975

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: देवगिरी

जिल्हा : औरंगाबाद

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते. सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी "सुरगिरी" या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची "देवगड व धारगिरी" अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या. या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती. यापैकी ‘ लासूर वेस ’ एक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे.
१ किल्ल्यातील वास्तू :
आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले, ज्यांची लांबी १२ सेंमी एवढी आहे, असे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्यांच्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्याच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्या दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्या प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्या दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्या दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे. विहीरीत उतरण्यासाठी पायर्यांची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची.

२ हत्ती तलाव :
मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी रुंदी-३८ मी खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते.

३ भारतमाता मंदिर :
या हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जाणार्या वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे.

४चांद मिनार :
भारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत. सध्या या मनोर्यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चांद मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. हे सर्व पाहून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात.

५ कालाकोट देवगिरी :
कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्यांच्या देवड्या, मग पायर्या लागतात. या सर्व पायर्या चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्या लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्या लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्यातून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या’ मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत .आत गेल्यावर एक निमुळता चौक दिसतो. तो उघडाच आहे. यावर छत नाही तो ४ ते ५ माणसे मावतील एवढाच आहे, त्यामुळे तिथे पोहचल्यावर उजवीकडच्या पायर्यांनी ओट्यावर चढावे लागते. कारण चौकात आल्यावर ओट्यावर चढणे हा एकच मार्ग आहे. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनविलेला आहे. येथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकुन शत्रु इथपर्यंत आला तर पुढे या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोरवाटे सारखा दिसणारा मार्ग ठेवलेला आहे.या खिडकी खाली दोन पायर्या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय केलेली आहे. पण खरा भुयारी मार्ग तर डावीकडे आहे. एवढेच नव्हे तर वर काही काही ठिकाणी भुयारी मार्गात कातळातील खिडक्या आहेत. याचा उपयोग वर असणार्या सैनिकांना शत्रूवर दगडधोंडे टाकण्यासांठी होत असे. हा सर्व भुयारी मार्ग ५० ते ६० मी लांबीचा आहे. पुढे या भुयारी मार्गातूनच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायर्या बांधलेल्या आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर शेवटच्या ठिकाणी जिथे आपण वरच्या टप्प्यावर पोहचतो, तिथे एक तवा ठेवलेला असायचा. त्यावर गरम तेल व मिरच्या ओतून हा धूर या अंधारी मार्गात सोडण्यात येत असे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करुन हा किल्ला जेवढा अभेद्य बनवता येइल तेवढा बनवला होता. एकंदर पाहाता हा किल्ला एवढा अभेद्य, दुर्गम आणि भक्कम आहे की त्याला सरळमार्गाने जिंकूण घेणे कठीणच होते.
भुयारी मार्गातून एकदा किल्ल्यावर आले की पुन्हा कातळकड्यात खोदलेल्या पायर्या लागतात. थोडे वर चढून गेले की गणेशाचे मंदिर आहे. एकंदर मंदिराच्या बांधणीवरुन हे मंदिर अलिकडच्या काळातील असावे. प्रथम वंदितो तुज गणराया असे म्हणून गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि वरच्या पायर्या चढायला लागायचे. १५० पायर्या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्यात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात.

पोहोचण्याच्या वाटा :
देवगिरीचा किल्ला औरंगाबाद - धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यात राहण्याची सोय नाही. औरंगाबादला राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :
किल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
औरंगाबादपासून अर्धा तास.

सूचना :
औरंगाबादहून देवगिरी , खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर , वेरुळची लेणी आणि औरंगाबादची पाणचक्की ही ठिकाण एकाच दिवसात पाहाता येतात. दररोज औरंगाबादहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सहल (गाइडेड टूर) या ठिकाणांना जाते.

रविवार, १४ एप्रिल, २०१९

किल्ला-::-मांगी-तुंगी (५८)

⛳ मांगी - तुंगी⛳

       मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे.
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते, ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणार्‍या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.

इतिहास

बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली.

पहाण्याची ठिकाणे :

मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते. मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. उन -वारा - पाऊस यामुळे या मुर्ती झिजलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही.

मांगी पेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत. त्यात जैन तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. त्यातील एका गुहेला बुध्द गुहा म्हणतात. तुंगी सुळक्यालाही प्रदक्षिणा मार्ग आहे.

पोहोचण्याच्या वाटा :

मांगी- तुंगीला जायचे असल्यास जाण्यासाठी नाशिक - सटाणा मार्गे (११३ किमी वरील) ताहाराबाद गाठावे. ताहारबाद - पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून ७ किमीवर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो.या रस्त्यावर भिलवडच्या पुढे दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गे ताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एसटी किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव आहे.

भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ, पाश्वर्नाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगीतुंगीच म्हणतात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर, या रस्त्यावर दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. पुढे पायर्‍या लागतात. सुमारे २००० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. येथे दोन वाटा फ़ुटतात. उजवी कडची वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावी कडची वाट मांगी सुळक्याकडे जाते.

मांगीसाठी :- प्रवेशव्दारातून डावीकडे गेलो की पुन्हा पायर्‍या चढून ३० मिनिटात मांगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत.

तुंगीसाठी :- प्रवेशव्दारातून उजवीकडे गेलो की आपण मांगी आणि तुंगी मधील डोंगरधारेवर येतो. या धारेवरून १० मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. तेथून पायर्‍या चढून १५ मिनिटात तुंगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत

ताहाराबादहून मांगीतुंगी पर्यंत जाण्यासाठी पूर्ण रिक्षा भाड्याने घेऊन जावे लागते.

ताहाराबाद ते भिलवड रिक्षा चालू असतात (सिट प्रमाणे पैसे देऊन). भिलवडहून मांगीतुंगी चालत गाठण्यास अर्धा तास लागतो.

राहाण्याची सोय :

गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय :

भिलवाडी गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :

गावातूनच पाणी घेणे आवश्यक आहे, कारण गडावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

पायथ्यापासून ३ तास लागतात.

सूचना :

१) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर झाडे किंवा शेड्स नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर चढुन गेल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो.

२) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर आणि सुळक्यांवर पिण्यायोग्य पाणी नाही.

३) मांगीतुंगी सुळक्यां पैकी मांगीच्या खाली १०८ फ़ूट उंच भगवान महावीरांची मुर्ती बनवण्याच काम चालू आहे. तिथे पर्यंत रस्ताही बनविलेला आहे. काही वर्षात भगवान महावीरांच्या मुर्ती पर्यंत गाडीने जाता येईल आणि तिथुन मिनिटात मांगीवर जाता येईल.
 ⛳

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

🌹🌹शिवराजमुद्रा🌹🌹

🚩 *शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ नेमकं काय सांगते?*



🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन.

👉 शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे.

*प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।*
*शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।*

▪ *मराठी अर्थ:* ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’

▪ *इंग्रजी अर्थ:* The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon. It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

किल्ले-वासोटा (५७)

*भटकंती साठी सातारा, महाबळेश्वर परिसरातील उत्तम किल्ला वासोटा गड*

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.

*नाव : वासोटा (व्याघ्रगड)*

*उंची : ४२६७ फूट्*

*प्रकार : वनदुर्ग*

*चढाईची श्रेणी : मध्यम (परिस्थितीनुसार अवघड)*

*ठिकाण : सातारा, महाराष्ट्र*

*जवळचे गाव : कुसापूर, चोरवणे*

*डोंगररांग : महाबळेश्वर कोयना*

*सध्याची अवस्था : व्यवस्थित*

सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.

सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.

*इतिहास*

वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत

शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --

*श्रीमंत पंत प्रतिनिधी*
*यांचा अजिंक्य वासोटा;*
*तेलिण मारी सोटा,*
*बापू गोखल्या सांभाळ कासोटा*


*वासोटा गडावर*

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

किल्ले-पारोळा (५६)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे*🏇🏇🏇
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀ *किल्ला क्र.५६* 🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀
⛳⛳⛳ *किल्ले पारोळा* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 0

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले

डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : जळगाव

श्रेणी : सोपी

१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे.. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला, तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थीतीत आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणार्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

इतिहास :
१५७.५ मीटर लांब व १३०.५ मीटर रुंद असलेला हा किल्ला जहागिरदार हरी सदाशिव दामोदर याने इ.स १७२७ मध्ये बांधला. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी या भागावर सत्ता प्रस्थापित केली, पण किल्ला जहागिरदारांच्या ताब्यात ठेवला. इ.स १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजाविरुध्द बंड झाले, त्यावेळी कॅप्टन ब्रिग्र याला ठार मारण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला होता. याचा ठपका लालभाऊ झाशीकर र्यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. इ.स १८५७ च्या उठावात झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली.

पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वाराने आपण गडात प्रवेश करतो. आत आल्यावर दोन्हीबाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या दिसतात; तर समोर १५ फूट उंच तटबंदी दिसते. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच बालेकिल्ल्याचा भक्कम चौकोनी बुरुज त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी दिसतात. एकेकाळी त्यांच्यावर फांजी बांधलेली असावी. या कमानीं जवळच एक चौकोनी विहीर आहे. कमानीकडून पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी जिना आहे. या पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे.(पारोळाकरांनी या तलावाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे व तलावात केरकचरा टाकल्यामुळे त्याची शोभा गेली आहे) या तलावात उतरण्यासाठी तटबंदीखाली दोन ठिकाणी चोर दरवाजे आहेत. तसेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस पारोळा गावात आहेत. पूर्वेच्या तटबंदी समोर महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराजवळ भूयार असून ते ८ कि मी वरील नागेश्वर मंदीरात उघडते असा स्थानिकांचा दावा आहे. मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या मागे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक विहीर आहे.

बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत. या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेर्या असाव्यात. बालेकिल्ल्यात असलेल्या दोन विहीरीतील पाणी हौदात ओतून ते या कचेर्यांपर्यंत खेळवण्यात आले होते, ते चर आजही पाहायला मिळतात. या कचेर्यांच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते, त्र्यांचे अवशेष पहायला मिळतात. कचेर्यांच्या भिंतीत जंग्यांची रचना केलेली आहे. कचेर्यांच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील बुरुजात दारुकोठार आहे. या कोठारालाही सर्व बाजूंनी जंग्या आहेत.

गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी आहे व तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला १० फूट * १० फूट खंदक आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पूर्वीच्याकाळी प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा लाकडी पूल होता.

पोहोचण्याच्या वाटा :
पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने देशाशी जोडलेल आहे. पारोळा जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी ते धुळे शहरापासून जवळ आहे. धुळे - जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे.

राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.

जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.

पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.
सूचना :
१) धुळ्याहून - अंमळनेर - (२१ किमी) पारोळा - (८ किमी) बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
२) अंमळनेर , बहादरपूर या किल्ल्र्यांची माहीती याआधीच दिलेली आहे.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
🌹शंकर इंगोले🌹
मो नं.९८२२७९७०५९

किल्ले-भुदरगड(५५)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🏇🏇🏇 *गडकोट महाराष्ट्राचे*🏇🏇🏇
🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀ *किल्ला क्र.५५* 🧗🏿♀🧗🏿♀🧗🏿♀
⛳⛳⛳ *किल्ले भुदरगड* ⛳⛳⛳
*र केली नव्हती.*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 3208

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : कोल्हापूर
श्रेणी : मध्यम

इतिहास :
हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते.

अठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात हया गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.
पहाण्याची ठिकाणे :
पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. वाटेत महादेवाचे मंदीर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्या, कमानी व दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.

देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.

वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.

पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदीर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते.आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिर्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.


पोहोचण्याच्या वाटा :
१) कोल्हापूरहून ‘गारगोटी’ला जाणार्या अनेक एसटी बसेस आहेत. गारगोटी वरून पाल नावाच्या गावात जायचे, अंतर साधारण ५ कि.मी आहे. तिथपर्यंत जाण्यास खाजगी वहाने मिळतात. पालपासून पेठशिवापूर साधारण अर्ध्या तासाचे अंतर आहे स्वत:चे वहान असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो.
२) स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी - पुष्पनगर - शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर - भुदरगड गाठता येते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही.
राहाण्याची सोय :
भैरवनाथ मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.
पाण्याची सोय :
गडावर चिर्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी भैरवनाथ मंदीराच्या मागे हातपंप आहे.
सूचना :
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे ३ ते ४ तास.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
🌹शंकर इंगोले🌹
मो नं.९८२२७९७०५९

💐शिवकालीन वजने💐

शिवकालीन वजने(मापे)-
* अठवे- शेराचा 1/8
* अडशेरि- अडीच शेर
* अदपाव- अर्धा पावशेर
* अदमण- अर्धा मण
* अदशेर- अर्धा शेर
* अधोली- अर्धी पायली
* अंजली- ओजळभर पानी
* आटके- अर्धा शेर
* आढक- चार शेर, पायली
* कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
* कार्त- पाव रत्तल
* किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
* कुडव- आठ शेर
* कुंभ- वीस खंडी
* कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
* कोड- खंडी, वीस मण
* कोळवे- शेराचा अष्ठमांश
* खारी- 16 द्रोण, एक खंडी
* गरांव- अर्ध गूंज माप
* गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
* गुंज- एक वजन परिमाण
* चंपा- दोन शेर धान्याचे माप
* चवाटके- छटाक
* चवाळामण- एक प्रकारचा मण
* चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
* चाळीसा- चाळीस शेरांचे माप
* चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
* चिपटे- पावशेराचे माप
* चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
* चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
* चोथवा- एक पायली
* चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
* चौशेरी- चार शेरांचे माप
* छटाकी- छटाक
* छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
* टवणा- पांच शेरांचे माप
* टांक- एक तोळा
* टिपरी- मापी पावशेर
* टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
* टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
* डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
* डोळा- 16 शेरांचे माप
* धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
* धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
* नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
* नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
* नाकटी- दीड पावशेराचे माप
* नाळके- एक माप
* निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
* तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
* पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
* पड- मापी 2 शेर, पाउन शेर
* पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
* पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
* पान- पावशेर
* पाभ- एक प्रकारचे माप
* पायली- चार शेरांचे माप
* पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
* पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
* पिटके- अदपाव
* फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
* बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
* भरा- धान्याचे एक माप
* भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
* भार- आठ हजार तोळे वजन
* मणखाण- सुमारे एक मण
* मणका- एक मणाचे माप
* मापटे- अर्धा शेर
* मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
* माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
* मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
* मूठ- मुठभर धान्य
* रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
* रोवळा- एक माप
* लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
* वाल- तिन गूंजाभर वजन
* वैताद- एक तृतयांश तोळा
* शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
* शिरिद- पावशेर
* शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
* शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
* शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
* साक- एक हाताची ओंजळ
* सामाशी- सहा मासे वजनाचे
* सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

शिवाजीमहाराज

"जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराज न प्रमाणे लढा !
-- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
-- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
-- स्वामी विवेकानंद.

"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
-- बराक ओबामा, अमेरिका.

"जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
-- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
-- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही.
⛳⛳⛳⛳⛳

किल्ला-महिपालगड (५४)

*किल्लेमहाराष्ट्राचे
किल्ला- महिपालगड*

किल्ल्याची ऊंची : 3220

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: कोल्हापूर

जिल्हा : कोल्हापूर

श्रेणी : मध्यम

प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही.

पहाण्याची ठिकाणे :
बेळगावहून ४५ मिनिटामध्ये आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलात पोहचतो. श्री गुरु चरित्राच्या हरवायचे १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे. मंदिरासमोर सुंदर नंदी आहे. गाभार्यात भव्य शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत आहेत. मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत. मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे.

वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागून डांबरी सडकेने आपण महिपालगडाकडे निघायचे. या मार्गावरुन जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. आत प्रवेश करण्यासाठी प्रखर विजेरी आवश्यक आहे, कारण या भुयारातून पाणी भरलेले आहे. या कातळाच्या वर असलेल्या पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो.

या पठाराच्या उजव्या बाजूने जाणार्या डांबरी सडकेने आपण गडावरील वस्तीवर पोहचायचे. गडावरील वस्ती सुरु होण्यापूर्वी आपणास उध्वस्त तटंबदी, प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. गावकरी त्यांना गौळ देव म्हणतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो, येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणार्या सडकेने पुढे गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. यावर गणेशाचे सुंदर शिल्प आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ४० फूट आहे. तिची खोली किती आहे, याच अंदाज कोणालाच नाही. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. ही विहिर पाहून आपण विहिरीच्या मागे असलेल्या अंबाबाई मंदिरात जायचे. उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपणांस सुस्थितीतील निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यास पायर्या आहेत. बुरुजाशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे. तटबंदी आपल्या उजव्या हातास ठेवून आपण गडाचे दुसरे टोक गाठायचे. तटातून खाली उतरणार्या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो. त्याचे बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरील प्रत्येक घरासमोर आपणास इतिहासकाळातील पाणी भरुन ठेवलेली दगडी भांडी दिसतात. गडावरील लोकांना गडाविषयी अभिमान आहे. मात्र त्यांनी तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गडावरील वाढती लोकसंख्या व विभक्त होणारी कुटुंबे ही त्याची कारणे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
महिपाल गडातच मोठे गाव वसलेले आहे. त्याचे नावच "महिपालगड" असे आहे. महिपालगड जरी कोल्हापूर जिल्हयात येत असला, तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठायचे. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे देवरवाडी गावात जायचे. देवरवाडीतून वैजनाथमहिपाल गाव ६ किमी वरच आहे. किल्ल्यातून गाडीरस्ता गेलेला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर निवासाची व्यवस्था आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९

किल्ला-रोहीलगड (५३)

किल्ले महाराष्ट्राचे

 *किल्ला क्र.५३* 
⛳⛳⛳ *किल्ले रोहिलगड* ⛳⛳⛳

किल्ल्याची ऊंची : 700

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: रोहिलगड

जिल्हा : जालना

श्रेणी : मध्यम

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड नावाचा किल्ला आहे. या सपाट प्रदेशात उंच सलग अशी डोंगररांग नाही आहे. छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. अशाच एका टेकडी वजा डोंगरावर रोहिगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहिलगड याच नावाने ओळखले जाते. अंबड ही यादवकालीन बाजारपेठ या किल्ल्याच्या जवळ असल्याने देवगिरी या राजधानीहून बाजारपेठेकडे जाणार्या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती यादव काळात केली गेली असावी.

पहाण्याची ठिकाणे :
रोहिलगड किल्ला गावा मागील डोंगरावर आहे. किल्ला आणि बाजूची टेकडी यांच्या मधून गावातून येणारा कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने रोहिलगड किल्ल्याचा डोंगर आणि टेकडी मधील घळीत येऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर शेतं आहेत. पायथ्यापासून येथे पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी डावीकडे वळून ५ मिनिटे चालल्यावर कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेचे छत ९ खांबांवर तोललेले आहे. गुहेत प्रवेशव्दारा जवळ एक कोरडे टाके आहे, टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. गुहेच्या प्रवेशव्दारा समोरील भिंतीत एक चौकोनी ३ X ३ फ़ुटाची खोबण कोरलेली आहे. या गुहेच्या डाव्या बाजूला एक छोटी गुहा आहे. गुहा पाहून परत दोन घळीत येऊन वर चढायला सुरुवात करावी. घळीतून वर चढतांना उजव्या बाजूला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात. १० मिनिटात आपण तटबंदी जवळ पोहोचतो. या ठिकाणी तटबंदीच्या खालच्या बाजूला एक बुजलेले कोरडे टाके आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेले पठार दिसते. प्रथम डाव्या बाजूला जावे. या ठिकाणी किल्ल्यावर गावाच्या बाजूला एका वाड्याचे अवशेष आहेत. पुढे एक पाण्याचे कोरडे पडलेले टाके आहे. ते पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जातांना वाटेत एक दगडी रांजण आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एका वास्तूचे अवशेष आहेत. येथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. 

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण किल्ल्यावर चढून आलेल्या घळीच्या उजव्या बाजूच्या पठारावर जावे. येथे पाण्याचा कोरडा पडलेला तलाव आहे. पुढे गेल्यावर एक खड्डा आणि त्यात उगवलेली बाभळीची झाडे दिसतात. या खड्य़ात एक १२ खांबांवर तोललेल कोरडे खांब टाक आहे. हे टाक पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे गेल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. रोहिलगड हा या भागातली एकमेव डोंगर असल्याने गडावरून दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ला व्यवस्थित पाण्यासाठी अर्धा तास लागतो. 

पोहोचण्याच्या वाटा :
जालना शहर रस्ताने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेले आहे. जालना- अंबड रस्त्याने जालना रोहीलगड अंतर ४० किलोमीटर अंतरावर आहे. रोहिलगडला जाण्यासाठी जालन्याहून थेट एसटी सेवा नाही. जालन्याहून एसटीने अंबड गाठावे. अंबडहुन रोहिलगडला जाण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेला एसटी बसेस आहेत. खाजगी वहानाने जालन्याहून अंबडला न जाताही थेट रोहिलगडला जाता येते.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही

जेवणाची सोय :
जेवणाची सोय किल्ल्यावर नाही.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
रोहिलगड गावातून २० मिनिटे लागतात.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते.
💐💐💐💐💐💐💐
*संकल्पना*
*शंकर इंगोले*
९८२२७९७०५९
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

माझा गाव-ओतुर ता.-जुन्नर

इतिहास ओतूर गावचा
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यात कल्याण नगर राज्य महामार्ग क्र.222 वर पुण्यापासून 100कि.मी अंतरावर वसलेले ऐतिहासिक ओतूर हे गाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले,ते येथील कपर्दिकेश्वर आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी स्थळामुळे. इ.स १३४७ मध्ये महाराष्ट्रात बहमनी राज्याची स्थापना झाली.त्यावेळी ओतूर गावाचा व जुन्नर परिसराचा समावेश बहमनी राज्यात होता.बहमनी राज्याच्या विघाटनानंतर निर्माण झालेल्या पाच सत्तां पैकी ओतूर परिसरावर निजामशाहिची सत्ता होती.१० नोव्हेम्बर १५६६ रोजीच्या एका फार्सी पत्रामध्ये ओतूर गावचा उल्लेख वोतूर असा आढळतो.
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या उत्तरेस एक कि.मी. अंतरावर झाडाझुडपातून ,डोंगरदऱ्यातून खळाळत येणाऱ्या दाक्षिण वाहिनी चंद्रकोर ष पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात मनमोहक भव्य श्री क्षेत्र कपर्दीकेश्वराचे मंदिर वसलीले आहे. या मंदिराचे देखने रूप पाहताक्षणी भक्तांचा थकवा दूर होतो.बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज संजीवनी समाधी मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर या त्रिस्थळी पवित्र स्थानामुळे पावन झालेले हे ठिकाण हवेहवेसे वाटनारे आहे.वारकरी सांप्रदायाचा “रामकृष्णहरि” हा मंत्रघोष याच ठिकाणी प्रथम दिला गेला,म्हणून या स्थानाला धर्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
उत्तमापूर हे गावचे प्राचीन नाव.या नावातच ओतूर गावाची प्राचीनता लक्षात येते.उत्तमापूर चा अपभ्रंश होत ओतूर हे नाव पुढे पुढे रूढ़ झाले.फार पूर्वीपासून मांडवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि “स्वयंभू शिवलिंगाच्या” कपर्दीकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराणकालापासून होत आलेला आहे; परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील “कलात्मक” कोरड्या तांडळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यानी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्येसाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे. संतांची तपोभूमी म्हणून या ठिकानाला खूप महत्व असूनही पंढरपूर ,आळंदी ,देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे.
कपर्दीकेश्वर या नावाविषयी एक आख्यायिका आहे. राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाल १५ व्या शतकातील आहे. त्यांनी मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्षे अनुष्ठान केले. येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवाडी मिळाली. (संस्कृतमध्ये कवडीला कप्रदिक असे म्हणतात.) आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे. महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय तेजस्वी, सुंदर स्वयंभु शिवलिंग मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे. यादव राजवटीच्या अस्तानंतर अनेक लहानमोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. यात इराणच्या मुस्लीम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खुप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीनदोस्त केली. त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली. मांडवी नदी ऋषिवर्य मांडव्य ॠषींच्या आश्रमापासून उगम पावून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या पारिसरला विलोभनीयरीत्या सुशोभीत करीन या तीर्थक्षेत्राजवळ येऊन दाक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संथपणे आजही वाहत आहे. याच पवित्र ठिकाणी बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शु. द्वादशी इ.स.१५७१ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी ओतुर येथे संजीवन समाधी घेतली. ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश करून अनुग्रह देत ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो. चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून, दगड किंवा विटांचा यात समावेश नसूनसुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदिर देहु व ओतुर या दोनच ठिकाणी आहेत.
कपर्दिकेश्‍वर हे प्राचीन स्वयंभू शिवालय आहे. जुन्नर तालुक्यातील प्राचीन मंदिरा पैकी हे एक मंदिर आहे.मंदिरामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. 

कपर्दिकेश्‍वर हे प्राचीन स्वयंभू शिवालय आहे. जुन्नर तालुक्यातील प्राचीन मंदिरा पैकी हे एक मंदिर आहे.मंदिरामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. श्री क्षेत्र कपर्दिकेश्वर आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे गुरु जगदगुरू श्री चैतन्य महाराज यांच्या समाधीने पावन झालेल्या या ओतूर तीर्थक्षेत्र. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली
मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. महाशिवरात्रीला तसेच श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी दूरवरून व परिसरातील भाविक मोठ्या संख्येत या तीर्थस्थळी येवून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शुद्ध द्वादशी सन १५७१ रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ही समाधी म्हणजे दगड-वीटा मातीने बांधलेली नसून, नैसर्गिकरीत्या त्यांच्या अंगावर मातीचे वारुळ झाले. शेकडो वर्षे होऊनही हे वारुळ जसे पूर्वी होते तसेच आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री कपर्दिकेश्‍वर देवधर्म संस्था दर वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी यात्रा भरविते. 
माहिती संकलन - त्रिवेद डुंबरे

श्री कपर्दिकेश्वर, ओतूर

ओतूर गावापासून उत्तरेच्या दिशेने साधारण एक किलोमीटरवर अंतरावर चालत गेल्यास श्रीकपर्दिकेश्वर मंदिर लागतं. मंदिर मांडवी नदीच्या तीरावर वसलं आहे. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे, असं म्हणतात. त्याच्या दोन आख्यायिका आहेत. एकदा नदीकिनारी आपण वाळूचे शिवलिंग तयार करत आहोत, असा दृष्टांत एका साधकास झाला. त्या शिवलिंगात एक कवडी म्हणजे कपर्दिक आहे. त्या कवडीची यथासांग पूजा करून त्यावर शिवलिंग ठेवावं. आणि त्याची कपर्दिकेश्वर म्हणून स्थापना करावी. त्याप्रमाणे साधकानं केलं. दुसरी कथा अशी की, सध्या कपर्दिकेश्वराचं मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे नांगरणी चालली होती. त्या ठिकाणी नांगराच्या फळाला स्वयंभू पिंड लागली. तिची यथासांग पूजाअर्चा करून ‘कपर्दिकेश्वर’ म्हणून स्थापना केली.
माघ शुद्ध दशमीला 29 जानेवारी 1996 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्या शिखरावर कलशारोहण झालं. रंगकाम झालं. टिकाऊ तिवारी राजस्थानी दगड वापरण्यात आला. सभामंडपाचं रंगकाम केलं आहे. जागृत स्वयंभू देवस्थानची दररोज पूजाअर्चा केली जाते. प्रत्येक श्रावण सोमवारी इथे खास उत्सव असतो. प्रत्येक सोमवारी मोकळय़ा तांदळाच्या एकावर एक अशा पाच पिंडी लिंबावर ठेवल्या जातात. पाचव्या सोमवारी पाच पिंडी असतात. या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांची एकच गर्दी होते

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

किल्ले-वेताळगड (५२)

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.
~पहाण्याची ठिकाणे :~
वेताळगड किल्ल्याच्या एका बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मार्गाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या या दोन बुरुजां पेक्षा उंच व भव्य बुरुज आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजा पर्यंत पोहोचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. दोन बुरुजांमधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेशव्दाराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला "जंजाळा दरवाजा" म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फूट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. या जीन्याने वर गेल्यावर दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जीना आपल्याला एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.

प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुजात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळत. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्याव्रर नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.

किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जातांना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानींच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोकांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवगिरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याचा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.

किल्ल्याच्या मुख्या दरवाजाकडे जाण्यासाठी बारादरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फूट १० इंच लांबीची तोफ पडलेली आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुजात बसवलेले किल्लाचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फूट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले की आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.


रुद्रेश्वर लेणी :- वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.

स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी बरोबर बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागतात. २) हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.
सूचना :
१) स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

किल्ले-अजमेरा (५१)

अजमेरा (Ajmera)
किल्ल्याची ऊंची : 2854
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: दुंधेश्वर रांग
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.

खाजगी वहानाने दोन दिवसात कर्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. पहिल्या दिवशी सकाळी कोट्बारी या बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचावे. गावातून गाईड घेऊन बिष्टा किल्ला पाहावा. बिष्टा किल्ल्याला जाऊन परत गावात येण्यास ४ ते ५ तास लागतात. बिष्टा पाहून झाल्यावर जेवण करुन कर्हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. पायथ्यापासून कर्हा किल्ला पाहून परत येण्यास ३ तास लागतात. कर्हा किल्ला पाहून झाल्यावर देवळणेचे जोगेश्वर मंदिर पाहावे. महादेवाचे दर्शन घेऊन दुंधा किला गाठावा. तो पाहाण्यास एक तास लागतो. दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा किंवा पहाडेशवर येथे जाऊन अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा . यापैकी कुठल्याही ठिकाणी जेवणाची सोय होत नाही. आपला शिधा बरोबर बाळगावा.

Ajmera

Ajmera
पहाण्याची ठिकाणे :
अजमेर सौंदाणे गावातून एक रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिरा शेजारी अजमेरा किल्ल्याचा डोंगर आहे. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व आपल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेऊन मंदिराच्या परिसराच्या बाहेर यावे. पहाडेश्वराच्या कपाउंडला लागून एक कच्चा रस्ता डोण्गराला लगटून पुढे जातो. या रस्त्याने चालत गेल्यावर १० मिनिटात उजव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसते. त्यात शेंदुराचे ठिपके आणि त्रिशुळ काढलेला मोठा खडक आहे. त्याला माऊली म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला एक खडक आहे. त्याला म्हसोबा म्हणतात. या म्हसोबाच्या मागे जो डोण्गर आहे त्याच्या अर्ध्या उंचीवर गुहा आहेत. त्यात आदिवासींचा डोंगरदेव आहे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगदेवाचा डोंगर ठेउन पायवाट पुढे दाट झाडीत शिरते. या झाडीतून १० मिनिटे चालल्यावर दोन डोंगरांच्या घळीतून डोंगर चढायला सुरुवात होते. साधारण अर्ध्या ते पाऊअण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश केल्यावर प्रशस्त गडमाथा दिसतो.प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस उंचावर झेंडा लावलेला दिसतो. झेंद्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. तर डाव्या बाजूला एक कोरडा तलाव आहे. पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला महादेवाचे उध्वस्त मंदिर आहे. या ठिकाणी नंदी आणि पिंड आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्य बाजूला दुसरा तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक टाक बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही. टाक पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथून आजूबाजूचा परिसर, कर्हा , बिष्टा हे किल्ले दिसतात. गडमाथा फ़िरण्यास अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून ८ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे अजमेर सौंदाणे हे गाव आहे. अजमेर सौंदाणे गावातून रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय सटाणा येथे आहे.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही. पहाडेश्वर मंदिरातून भरुन घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पहाडेश्वर, (अजमेर सौंदाणे) पासून १ ते १.५ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
ऑगस्ट ते फ़ेब्रुवारी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
संकलक-श्री शंकर इंगोले
सोलापुर मो.नं.9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शनिवार, ३० जून, २०१८

किल्ले-अंमळनेर (५०)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
किल्ले-अंमळनेर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : जळगाव
श्रेणी : सोपी
अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.

Amalner
इतिहास :
अंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.
पहाण्याची ठिकाणे :
अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
अंमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने व रेल्वेमार्गाने देशाशी जोडलेल आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलक-श्री शंकर इंगोले
मो.नं.-९८२२७९७०५९
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

किल्ला-अंतुर (४९)

किल्ला-अंतुर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
जिल्हा : औरंगाबाद
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा लेण्यांनी नटलेला आहे. या जिल्हातील जगप्रसिध्द अजंठा लेणी ही, सह्याद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. या अजंठा रांगेत अनेक किल्ले आहेत, यापैकी सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे.

Antoor

Antoor
पहाण्याची ठिकाणे :
अंतुर किल्ल्यावर नागापूरहुन वहानाने किंवा गोपेवाडीतून चालत आल्यास आपण किल्ल्याच्या भव्य बुरुजाजवळ पोहोचतो (इथेच वहानतळ बनवलेला आहे). येथून सिमेंटच्या पायवाटेने किल्ल्याचा पहिल्या दरवाजाकडे जातांना वाटेत डाव्या बाजूस पहार्याची चौकी दिसते. पायवाटेच्या वरच्या बाजूस काही बुरुज दिसतात. त्यात एक तिहेरी बुरुज आहे. पुढे थोड्या पायर्या चढल्यावर पहिला दरवाजा लागतो.हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजाच्या समोर एक दगडी तोफगोळा पडलेला दिसतो. दरवाजाच्यावर कमानीच्या दोन बाजूला असलेल्या कोनाड्यात पूर्वी शरभ होते. आता फक्त उजव्या कोनाड्यातील शरभ शाबुत आहे. दरवाज्यातून पुढे जाणार्या वाटेच्या दोन्ही बाजूला तटबंदी आहे. यावाटेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर आपण दुसर्या दरवाज्यापाशी पोहोचते. पहिल्या दरवाजाला काटकोनात असलेला हा भव्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूचे बुरुज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानीत शत्रुवर मारा करण्यासाठी (गरम तेल/ निखारे यांचा) खाचा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाच्या आतील बाजूस २ कमळपुष्पे कोरलेली आहेत आणि ४ तोफगोळे दरवाजावर लावलेले आहेत. दुसर्या दरवाजातून आत आल्यावर पायर्यांची वाट काटकोनात वळून तिसर्या दरवाज्यापाशी जाते. हा दरवाजा सुध्दा दक्षिणाभिमुख आहे. कमानीवर कमळपुष्पे कोरलेली आहेत. कमानीवर मध्यभागी ५.५ फ़ूट लांब व २ फुट रुंद फारसी लिपीतील शिलालेख आहे. कमानीवर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायर्याही आहेत. दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे एक उध्वस्त वास्तु आहे. त्यात काही कोरीव दगड पडलेले आहेत.

दरवाजातून आत शिरल्यावर समोर तलाव दिसतो. तर उजवीकडे जाणारी वाट एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आणि राजवाडा यामधून पुढे जाते. या राजसंकुलात जाण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आहे. आत दोन मोठे वाडे बांधलेले दिसतात. यांच्या वर घुमट आहेत. एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पायर्याही कोरलेल्या दिसतात. या वाड्याच्या मागे काही थडगी आहेत. वाड्यातून बाहेर पडून पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक दर्गा दिसतो. पुढे चौकोनी आकाराचा सुटा टेहळणी बुरुज आहे. त्यावर चढायला पायर्या आहेत. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो. बुरुज पाहून तलावाजवळ यावे. या तलावातील पाणी खराब झालेले आहे. या तलावाच्या एका बाजूला गोदी नावाचा दर्गा आहे. वाड्याच्या विरुध्द दिशेला तलावाच्या दक्षिणेला एक भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा इथे बांधण्याचे प्रयोजन मात्र कळत नाही. प्रवेशव्दाराच्या मागिल बाजूस पडक्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हे सर्व पाहून पश्चिमेकडे दिसणार्या बुरुजाकडे चालत जातांना दोन उध्वस्त वास्तु लागतात त्यातील तलावाजवळील तळघर असलेली वास्तू म्हणजे दारुखाना असावा. बुरुजापासून तटबंदीच्या कडेकडेने उतरणारी वाट आपल्याला कातळाच्या पोटात कोरलेल्या टाक्यांपाशी घेऊन जाते. येथे चार खांब टाकी कोरलेली दिसतात. त्यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या वरच्या बाजूला एक कोरडा बांधीव तलाव आहे.

टाकी पाहून परत बुरुजापाशी येऊन किल्ल्याच्या दक्षिणेकडील निमुळत्या भागाकडे चालायला सुरुवात करावी. इथे एक विशेष गोष्ट जाणवते ती म्हणजे या भागाला किल्ल्यापासून विभागणारी एक तटबंदी आणि २ बुरुज बांधलेले आहेत. या तटबंदी मधून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी एक दरवाजा काढलेला आहे. आत प्रवेश केल्यावर आपण गडाचे दक्षिणेकडचे टोक गाठतो. या भागात एक तोफ पडलेली दिसते. त्याच्या समोरच तटबंदी आणि मागचा बुरुज यामध्ये एक छोटीशी खोली आहे. बाजुलाच एक दरवाजा व आतमध्ये पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. हा भाग म्हणजे अंतुर किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला भव्य बुरुज. हा बुरुज आणि समोरचे पठार यात ५० फुटाचे अंतर आहे. मोठ्या डोंगर रांगेपासून किल्लावेगळा करण्यासाठी येथे कातळ फ़ोडून ५० फ़ुटाचा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे आणि या खंदकाच्या किल्ल्याच्या बाजूला भव्य बुरुज बांधून किल्ला मजबूत केलेला आहे. सध्या या बुरुजाच्या आत गैबनशाली बाबाचा दर्गा आहे. आत शिरल्यावर बुरुजावर जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. बुरुजावरुन समोरचे पठार आणि वहानतळ दिसतो.

अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जातांना रस्त्याच्या खालच्या बाजूस डावीकडे एक पूरातन मैलाचा दगड दिसतो. त्यावर फ़ारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग दाखवलेले आहेत.
अंतुर किल्ला दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
अंतुर किल्ला हा महाराष्ट्राच्या जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बसलेला आहे. इथे वहानाने पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत.

१) औरंगाबाद मार्गे :- औरंगाबाद मार्गे कन्नड गाठावे. कन्नड - नागापूर अंतर २० किमी आहे. कन्नडहुन नागापूरला जाण्यासाठी एसटी बस किंवा जीप मिळू शकतात. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.

एसटी बस किंवा जीपने नागापूर गावात उतरल्यास :- नागापूर गावातून ३ किमी अंतरावर कोलापूर नावाचे गाव लागते. इथपर्यत नागापूर पासून पोहचण्यास पाऊण तास पुरतो. पुढे कोलापूर पासून किल्ल्याच्या पायर्या गाठण्यास दीड तास लागतो. कोलापूर गाव मागे टाकल्यावर दहा मिनिटात वाट डावीकडे वळते. इथून १५ मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक मारुतीची मूर्ती लागते. या मूर्तीच्या समोरुन वाट डोंगराच्या डावीकडून पुढे सरकते. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे ही वाट डोंगराच्या नेहमी डावीकडूनच पुढे जाते. पुढे एका डोंगरावर घुमटीसारखा भाग दिसतो. पण तिथे वर न जाता पुन्हा डोंगराला डावीकडून वळसा घालत वाट दरीपर्यंत येऊन थांबते. इथून अंतुरचे प्रथम दर्शन होते. दर्शन घेऊन पुन्हा अंतुरच्या दिशेने चालत सुटायचे. वाट किल्ल्याच्या समोर असणार्या पायथ्याशी येऊन पोहचते. वर न चढता उजवीकडे जंगलात पठाराला डावीकडे ठेवत जाणारी वाट धरायची आणि १० मिनिटातच डावीकडे एक पहारेकर्यांची देवडी लागते. २ मिनिटातच गडाचा पहिला दरवाजा दिसतो. नागापूर पासून पहिल्या दरवाज्या पर्यंत पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात.

२) चाळीसगाव मार्गे :- चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागापूर गाव आहे. चाळीसगावपासून ४० किमी अंतरावर नागापूर आहे. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.

चालत जाण्यासाठी :- चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागद गाव २० किमी अंतरावर आहे. नागद गावातून पांगरा- बेलखेडा मार्गे गोपेवाडी गाठावी. गोपेवाडीच्यावर एक धनगरवाडा आहे. पावसाळा सोडुन इतरवेळी वहानाने थेट धनगरवाड्यापर्यंत जाता येत. अथवा गोपेवाडीतून चढायला सुरुवात करावी. येथून चालत ३ तासात अंतुर किल्ल्यावर जाता येते. चाळीसगाव - नागद बस सेवा आहे. पुढे बस मिळण कठीण असल्याने खाजगी वहानाने गोपेवाडीपर्यंत जाण सोयीच आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावरील मशिदीमध्ये १० ते १५ लोकांना रहाता येऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
नागापूरहून चालत जाण्यास अडीच तास लागतो. गोपेवाडीतून चढुन जाण्यास तीन तास लागतात.

गुरुवार, ३१ मे, २०१८

किल्ले-मोहनगड ४८

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
किल्ले मोहनगड
किल्ल्याची ऊंची : 1890
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: वरंधा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
कोकणात जाणार्या घाटवाटा म्हणजे त्या काळच्या दळणवळण , व्यापाराचा एक उत्तम मार्ग असे. मग तो कावल्या घाट असो वा सिंगापुर नाळ , बोरोट्याची नाळ , बोचेघोळ नाळ , अगदी आग्या किंवा निसणीची वाट असो प्रत्येक घाटवाट आपलं एक स्वतःच वैशिष्ट्य जपणारी असते. त्यामधलीच एक महत्वाची घाटवाट म्हणजे वरंधा घाट. कोकणातल्या महाडहुन घाट माथ्यावरच भोर गाठण्यासाठी एक मोक्याची वाट.

पायथ्याच्या दुर्गाडी गावच्या नावावरून "दुर्गाडी किल्ला" असे नाव पडले. किल्ल्यावरील जननी मातेच्या मंदिरामुळे "जननीचा डोंगर" या नावानेही हा किल्ला ओळखला जातो.
*इतिहास :*
घाटवाटांना संरक्षण देण्यासाठी त्याकाळी राज्यकर्त्यांनी मोक्याच्या जागी गड किल्ल्यांची बांधणी केली. प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी राजांनी बाजीप्रभूंना लिहिलेले एक पत्र म्हणजे मोहनगडाला पुनः प्रकाशात आणण्यासाठी ठरलेला एक उपयुक्त दूवा आहे. पत्रात राजे बाजीप्रभुस म्हणतात, " फार दिवसांपासून ओस पडलेला जसलोधगड किल्ला डागडुजी करून व्यवस्थित करावा , ५-२५ शिबंदी बसवावी अन गडास मोहनगड ऎसे नाव दयावे , गड राबता ठेवावा". याच पत्राचा आधार घेऊन २००८ साली पुण्याच्या सचिन जोशींनी दुर्गाडी/जननीचा डोंगर हाच मोहनगड उर्फ़ जसलोधगड म्हणून प्रकाशात आणला.

*पहाण्याची ठिकाणे :* किल्ल्यावर तटबंदी, बुरूज किंवा अजुन काही बांधकाम नजरेस पडत नाही. एक पक्के बांधकाम केलेले जननी मातेचे मंदिर अन थोड़े पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्यावर पाण्याची तीन टाके आहेत. त्यामधील एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य असे आहे.

आकाश निरभ्र असेल तर मोहनगडावरुन राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड, कावळा किल्ला हे किल्ले दिसतात.
*पोहोचण्याच्या वाटा :*
१) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड गाठावे. महाडच्या पुढे महाड - भोर रस्तावर वरंधा घाट चढायला सुरुवात करावी. वरंधा घाटाने १० किलोमीटर गेल्यावर पुढे उजव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. शिरगावातून उजव्या बाजूची वाट किल्ल्यावर जाते. (शिरगावात शेवटी एक मंदिर लागेल इथूनच वाट किल्ल्यावर जाते)
२) मुंबई-> पुणे-> भोर मार्गे वरंधा घाटाने महाडला जातांना भोर पासून ३० किलोमीटरवर डाव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. या फ़ाट्यावर वळुन २ ते ३ किमी पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक मंदिर लागते. तेथूनच मोहनगडावर जाण्याची वाट आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यापैकी दोन वाटा शिरगावातून, तर एक वाट दुर्गाडी गावातून आहे. शिरगावात शेवटी एक मंदिर आहे. मंदिरा समोरुन जाणारी उजव्या बाजूची वाट गावकर्यांची नेहमीची किल्ल्यावर ये जा करण्याची वाट आहे, त्यामुळे ती मळलेली आहे. पण जर किल्ल्याच्या पायथ्याच घनदाट जंगल अनुभवायचे असेल तर डाव्या बाजूची वाट पकडावी. ही वाट पुढे दुर्गाडी गावातून वर येणार्या वाटेलाच मिळते. याच वाटेवर एक मुर्ती उभी करून ठेवलेली आहे. पुढे गेल्यावर अजून एक मंदिर आणि त्यापुढे कातळात कोरलेल्या पायर्या आपणास गड माथ्यावर नेउन सोडतात.
*राहाण्याची सोय :*
किल्ल्यावरील मंदिरात ३ ते ४ जण राहू शकतात.
*जेवणाची सोय :*
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
*पाण्याची सोय :*
किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
*जाण्यासाठी लागणारा वेळ :*
किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.जाण्यासाठी उत्तम *कालावधी :*
वर्षभर किल्ल्यावर जाता येते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संकलक
श्री शंकर इंगोले
९८२२७९७०५९
माहिती स्रोत
*ट्रेकक्षितिज.

मंगळवार, २९ मे, २०१८

किल्ला-रवळ्या ४७

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
किल्ले शिवबाचे
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : कठीण
रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.

Rawlya
इतिहास :
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.
पहाण्याची ठिकाणे :
रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून "चिमणी क्लाईंब" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.
राहाण्याची सोय :
पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
मार्च ते सप्टेंबर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संकलक-
श्री शंकर इंगोले
9️⃣8️⃣2️⃣2️⃣7️⃣9️⃣7️⃣0️⃣5️⃣9️⃣
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

किल्ला-बहादरपुर (६१)

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ *गडकोट महाराष्ट्राचे *किल्ला क्र.६१* ⛳⛳⛳ *किल्ले बहादरपूर* ⛳⛳⛳ किल्ल्याची ऊंची : 50 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डों...